coronavirus: कार्तिकने केला मदतीचा हात पुढे..केले एवढे कोटी दान

kartik aaryan
kartik aaryan

मुंबई- कोरोना व्हायरसच्या या संकटाला हरवण्यासाठी देशातील अनेक नामांकित चेहरे समोर आले आहेत आणि त्यांच्यावतीने मदत जाहीर केली आहे...याच साखळीत आता कार्तिक आर्यनचं नाव देखील पुढे येत आहे..अभिनेता कार्तिक आर्यनने देखील कोरोना व्हायरससोबत लढण्यासाठी गरजुंना मदत म्हणून एक कोटी रुपये दान केले आहेत..

याबाबतची माहिती कार्तिकने त्याच्या ट्वीटर अकाऊंटवरुन शेअर केली आहे...त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्वीटकरत लिहिलं आहे की, 'ही वेळ देशासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याची आहे..मी आज जे काही आहे, मी आज जे काही कमावलं आहे ते सगळं आपल्या देशातील लोकांमुळे कमावलं आहे..आणि म्हणूनच मी पी एम केअर्स फंडमध्ये एक कोटी रुपये दान करत आहे...मी आपल्या देशातील नागरिकांनाही आवाहन करत आहे की त्यांनी पुढाकार घेऊन आपापल्या क्षमतेनुसार दान करावे..' कार्तिक आर्यनच्या या पुढाकारामुळे त्याचे चाहते त्याची स्तुती करत आहेत.. 

कार्तिकच्या आधी देखील बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी मदतीचा हात पुढे केला आहे..या कठीण प्रसंगात त्यांनी दान केलं आहे..अभिनेता राजकुमार राव याने कोरोना व्हायरससोबत लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मदत निधी, मुख्यमंत्री(महाराष्ट्र) मदत निधी आणि झोमॅटो  फिडिंग इंडिया साठी त्याचं योगदान दिलं आहे..मात्र राजकुमार रावला त्याने दान दिलेल्या किंमतीचा खुलासा करावसा वाटत नाहीये..

राजकुमारने रविवारी ट्वीट करुन, 'कोरोना व्हायरस विरुद्धच्या या लढाईत सरकारची मदत करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र असणं गरजेचं आहे..हॅशटॅगपीएमरिलीफफंड आणि हॅशटॅगझोमॅटोफिडिंगइंडियाला गरजुंचे पोट भरण्यासाठी मी माझं काम केलं आहे..तुम्ही जे काही करु शकता त्यात मदत करा..आपल्या देशाला आपली गरज आहे..जय हिन्द. '

यात राजकुमारच्या चाहत्यांनी त्याने दिलेल्या रकमेचा आकडा न सांगता मदत केल्याने त्याची प्रशंसा केली आहे..यात एक नेटक-याने, खुपंच छान काम राजकुमार राव की तुम्ही दान केलेल्या रकमेचा खुलासा नाही केलात...तुम्हाला सलाम' असं म्हटलंय..  

kartik aryan donates 1 cr rupees for coronavirus relief fund to pm funds  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com