'भूल भुलैया 2'चा भलताच दबदबा, एका महिन्यात केला 'इतक्या' कोटींचा गल्ला.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kartik aryan's bhool bhulaiyaa 2 still hit in the box office, a month after its release earn 230 crore

'भूल भुलैया 2'चा भलताच दबदबा, एका महिन्यात केला 'इतक्या' कोटींचा गल्ला..

Bhool Bhulaiyaa 2 : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) 'भूल भुलैया 2' हा चित्रपट रिलीज होऊन एक महिना उलटला तरी अद्याप या चित्रपटाची जादू कमी झालेली नाही. भारतातच नाही तर भारता बाहेरही या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. अवघ्या एका महिन्यात या चित्रपटाने केलेली कमाई पाहून आपल्याला आश्चर्य वाटेल. (kartik aryan's bhool bhulaiyaa 2 still hit in the box office, a month after its release earn 230 crore) (bhool bhulaiyaa 2 box office collection)

हा चित्रपट 20 मे रोजी प्रदर्शित झाला. त्यावेळी या चित्रपटाच्या स्पर्धेत अनेक चित्रपट होते. किंबहुना कंगनाचा 'धाकड' चित्रपटही भूल भुलैया पुढे टिकू शकला नाही.पहिल्याच दिवशी भूल भुलैया २ ने १४ कोटींहून अधिकच कमाई केली होती. तर अवघ्या एका महिन्यात या चित्रपटाने जगभरात 230 कोटींची कमाई केली आहे.

कार्तिक आर्यनने एक पोस्टर शेअर करत सिनेमाच्या कमाई संदर्भात माहिती दिली. 'भूल भुलैया 2' ने जगभरात 230.75 कोटींची कमाई केली आहे. पोस्टर शेअर करत कार्तिकने चाहत्यांचे आभार मानले आहेत. कार्तिकने लिहिले आहे, 'भूल भुलैया 2' हा सिनेमा आजही तुम्ही सिनेमागृहात जाऊन पाहू शकता. सिनेमागृहात जाऊन नक्की पाहा. लवकरच हा चित्रपट 250 कोटींचा टप्पा पार करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 'भूल भुलैया 2'च्या यशानंतर या चित्रपटाचे निर्माता भुषण कुमार यांनी कार्तिक आर्यनला एक महागडी आलिशान कार भेट दिली होती. या आलिशान कारची किंमत 4 कोटी इतकी आहे..

Web Title: Kartik Aryans Bhool Bhulaiyaa 2 Still Hit In The Box Office A Month After Its Release Earn 230 Crore

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top