शाहरुखनं कार्तिकला मन्नतबाहेर का ताटकळत उभं ठेवलं? Shah Rukh Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kartik Aaryan ,Shah Rukh Khan
शाहरुखनं कार्तिकला मन्नतबाहेर का ताटकळत उभं ठेवलं? #kartikaaryan #shahrukhkhan #memory

शाहरुखनं कार्तिकला मन्नतबाहेर का ताटकळत उभं ठेवलं?

शाहरुख खाननं(Shah Rukh Khan) गेली अनेक वर्ष बॉलीवूडमध्ये आपलं प्रस्थ निर्माण केलंय ते मेहनतीनं,जिद्दीनं,चिकाटीनं आणि अर्थातच स्वतःच्या टॅलेेंटनं. त्याचा इथे कुणीही गॉडफादर नसताना तो दिल्लीतून मुंबईत आला,हिरो बनायचं स्वप्न पाहिलं अनं तो केवळ हिरो नाही तर सुपरस्टार पदापर्यंत पोहोचला. आज ज्या बंगल्यात तो राहतोय मन्नत मध्ये तो आधी कुणा दुसऱ्याचा बंगला होता. पण शाहरखनं स्वप्न पाहिलं की एक दिवस इथे आपण राहत असू अन् मग काय त्यानं स्वतःच्या जोरावर ते करून दाखवलं, एकदा शाहरुख एका मुलाखतीत म्हणाला होता, ''मी माझा बंगला जिथे आहे त्याच्या अगदी समोरच्या रस्त्याला कठड्यावर झोपायचो अन् एकटक बंगल्याकडे पाहायचो. मनात स्वप्न जागं ठेवायचो''.

हेही वाचा: सेल्फीच्या नादात नवाजुद्दिन सिद्दिकीला चाहत्यांनी फरफटत नेलं

काही वर्षांनतर मन्नतबाहेर फक्त शाहरुखची जागा कार्तिक आर्यनने(Kartik Aaryan) घेतली. आता त्याला काही मन्नतमध्ये राहायचं वगैरे नव्हतं तर त्याला फक्त शाहरुखला पहायचं होतं,त्याच्यासोबत सेल्फी काढायचा होता. कार्तिकनं मुंबईत आल्या आल्या पहिला हा ध्यास पकडला होता. त्यानं एका मुलाखती दरम्यान हा किस्सा शेअर केला. तो म्हणाला,''मला माहीत होतं शाहरुख खान दर रविवारी बंगल्याबाहेर आलेल्या लोकांना,त्यांच्या चाहत्यांना हात दाखवतात. त्यांना भेटतात. मी त्याच संधीचा फायदा घेतला. रोज रविवारी जायचं,मन्नतबाहेर तासनतास उभं राहायचं अन् शाहरुख आला की त्याला फक्त डोळे भरून पहायचं. एकदा तर गर्दीत चक्क त्याच्यासोबत सेल्फी काढण्याची संधीही मी उपभोगली. माझं ताटकळत उभं राहणं फळास आलं होतं''.

हेही वाचा: आजीबाईंच्या ठुमक्यांपुढे नॅशनल क्रश रश्मिकाही पडली फिकी;पहा व्हिडीओ

आज खरंतर कार्तिक स्वतः मोठा स्टार आहे. यंग क्रऊडसाठी हार्टथ्रोब आहे पण त्यानं हा किस्सा मस्त आनंद घेत शेअर केला. खरंतर शाहरुखच्या रेडचिली सिनेमातून नुकताच कार्तिकला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय. यामागे करण जोहर असल्याचं बोललं जातंय. पण कार्तिकनं ठरवलंय कोणाच्या वाकड्यात शिरायचं नाही,बोलायचं नाही फक्त काम करत रहायचं. कार्तिकचा ओटीटी वर प्रदर्शित झालेला 'धमाका' सिनेमा चांगलाच चालला. त्याच्या कामालाही पसंत केलं गेलं. आता तो आपल्याला 'भूलभूलैय्या २','शहजादा' या सिनेमात दिसणार आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top