'सारेगमप लिटिल चॅम्प्स'मुळे आयुष्यच बदलून गेलं - कार्तिकी गायकवाड

या शोमधील पंचरत्न सोशल मीडियावर होत आहेत ट्रोल
kartiki gaikwad
kartiki gaikwad

सारेगमप लिटिल चॅम्प्सचं sa re ga ma pa little champs नवं सिझन नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या सिझनमध्ये गायनाच्या क्षेत्रात इतिहास घडवणारे पंचरत्न परीक्षकाच्या खुर्चीवर बसून आता नव्या स्पर्धकांचं मार्गदर्शन करत आहेत. लिटिल चॅम्प्सच्या पहिल्या पर्वाची विजेती कार्तिकी गायकवाड Kartiki Gaikwad देखील परीक्षक म्हणून या कार्यक्रमात झळकतेय. याच निमित्ताने कार्तिकीने शोसंबंधी काही प्रश्नांची मोकळेपणाने उत्तरं दिली आहेत. (kartiki gaikwad sharing her experience of becoming judge in sa re ga ma pa little champs)

१. १२ वर्षांनी पुन्हा एकदा 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'चं नवीन पर्व सुरु झालं आहे. त्याबद्दल काय सांगशील?

- या पर्वाची उत्सुकता खूपच होती आणि आता हे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. झी मराठीवरील प्रत्येक कार्यक्रमावर प्रेक्षकांनी प्रेम केलं आहे आणि सारेगमप लिटिल चॅम्प्सचं पहिलं पर्व हे खूप गाजलं. प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम आम्हाला मिळालं आणि आता या नवीन पर्वाची दमदार सुरुवात नुकतीच झाली आहे. यातील स्पर्धक खूप उत्तम आहेत आणि प्रेक्षक या पर्वाला देखील प्रेक्षक खूप चांगला प्रतिसाद देत आहेत याचा मला आनंद आहे.

२. सारेगमप या कार्यक्रमाने तुम्हा पाचही पंचरत्नांना संगीत क्षेत्रात मोठा ब्रेक दिला, त्याच मंचावर पुन्हा एकदा तुम्ही आहात, पण एका वेगळ्या भूमिकेत, कसं वाटतंय?

- सारेगमपच्या मंचाने आमची ओळख निर्माण केली, या कार्यक्रमामुळे आमच्या संगीत क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात झाली. या कार्यक्रमातील आमचा प्रवास हा आमच्यासाठी अविस्मरणीय असा आहे. एक आई जशी आपल्याला बाळाला नेहमी जवळ करत असते तसंच झी मराठीने सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या आमच्या पर्वा नंतरदेखील आम्हाला अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमाद्वारे आमची कला सादर करण्याची संधी दिली, त्यामुळे आमची या कार्यक्रमाशी असलेलं नातं अधिकचं दृढ होत गेलं आणि आता पुन्हा याच मंचावर ज्युरीच्या भूमिकेतून आम्ही प्रेक्षकांच्या भेटीस आलो आहोत.

३. १२ वर्षांनंतर तुम्ही पाच जण एकत्र आला आहात, त्याबद्दल काय सांगशील?

- आमच्या पर्वानंतर ३ ते ४ वर्ष आम्ही पाचही जण अनेक कार्यक्रमांसाठी एकत्र आलो होतो. पण त्यानंतर सगळ्यांच्या वैयक्तिक कारकिर्दीमुळे आमचं फारसं भेटणं झालं नाही. पण आता पुन्हा एकदा आम्ही लिटिल चॅम्प्सच्या माध्यमातून एकत्र आलो आहोत आणि आमच्या पर्वात आम्ही जेवढी धमाल केली, तेवढीच धमाल आता आम्ही या पर्वात करतोय.

kartiki gaikwad
'सारेगमप'चे परिक्षक ओव्हर अ‍ॅक्टिंगमुळे ट्रोल; मृण्मयीचं सडेतोड उत्तर
kartiki gaikwad
'ही पोरी कोणाची?'; मराठी कपलचा सुपरहिट डान्स व्हिडीओ व्हायरल

४.ज्युरीच्या भूमिकेसाठी काही खास तयारी केली का?

- ही भूमिका अतिशय जबाबदारीची भूमिका आहे. त्यामुळे आपलं ठाम मत असणं खूप महत्वाचं आहे. तसंच या पर्वात अनेक नवीन गाणी ऐकायला मिळतील तेव्हा त्याची तयारी आणि त्यावर स्पर्धकांना मार्गदर्शन करण्याकडे आमचा कल असेल.

५. सारेगमपच्या मंचांमुळे तुझ्यात काय बदल झाला?

- या मंचामुळे माझं संपूर्ण आयुष्य बदललं. अतिशय कमी वयात आमच्यातील कला तमाम रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचली. त्यांचं प्रेम आम्हाला मिळालं आणि इतकंच नव्हे तर अनेक दिग्गज मान्यवरांचे आशीर्वाद आम्हाला मिळाले. या पर्वातील प्रत्येक क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय आहे आणि त्याचसोबत मी या मंचाकडून खूप काही शिकले. या कार्यक्रमाची विजेती होण्याचा बहुमान मला मिळाला आणि त्यामुळे माझं आयुष्यच बदलून गेलं. हे पर्व माझ्या आयुष्यातील एक सुवर्ण पान आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com