"त्यानेच वाद ओढवून घेतला"; गोविंदासोबतच्या वादावर कश्मीराची प्रतिक्रिया | Kashmera Shah | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kashmera Shah, Krushna Abhishek, Govinda

"त्यानेच वाद ओढवून घेतला"; गोविंदासोबतच्या वादावर कश्मीराची प्रतिक्रिया

कॉमेडियन कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek) आणि त्याचा मामा गोविंदा (Govinda) यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. गोविंदा आणि कृष्णा यांनी अनेक मुलाखतींमध्ये त्यांच्यातील मतभेदांबद्दल बोलून दाखवलं. इतकंच नव्हे तर हे दोघं कोणत्याही कार्यक्रमात एकमेकांसमोर येणं टाळतात. कृष्णाची पत्नी कश्मीरा शाह (Kashmera Shah) हिने नुकतंच 'बिग बॉस १५'च्या 'वीकेंड का वार' एपिसोडमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता अहुजा यांच्यासोबत झालेल्या भांडणाचा उल्लेख केला. बिग बॉसच्या घरातील करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांच्याविषयी बोलताना कश्मीराचा दिव्या अग्रवालशी वाद झाला. यावेळी कश्मीराच्या भांडणावरून सलमानने कृष्णाच्या सहनशीलतेचं उपहासात्मक कौतुक केलं.

कश्मीरा म्हणाली, "तुम्ही कृष्णाच्या सहनशीलतेचं म्हणताय, पण त्याचा उल्लेख केलाच आहे तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते. जेव्हा मी बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून गेल्या सिझनमध्ये सहभागी झाले होते, तेव्हा घराच जाण्यापूर्वी कृष्णाने मला ताकिद दिली होती की, कोणाशी भांडू नकोस. त्याचं ऐकून मी घरात कोणाशी भांडले नाही. मात्र बाहेर स्वत:च सर्वांशी भांडून बसला आहे. हे काय आहे सर? स्वत:च मामा-मामी आणि इतरांसोबत भांडला आणि मला सल्ला देत होता की कोणाशी वाद घालू नकोस. आता मी त्याचं अजिबात ऐकणार नाही."

हेही वाचा: दिशा पटानीच्या 'सुपरहॉट' बिकिनी फोटोवर टायगर श्रॉफची कमेंट

कश्मीराचं हे विधान ऐकून सलमान हसू लागला आणि तो पुन्हा कृष्णाला म्हणतो, "ऐकलंस का तू कश्मीराचं? ती आता तुझं ऐकणार नाही अजिबात. तिने याआधी पण कधी तुझं ऐकलं होतं का?" यावर कश्मीरासुद्धा हसू लागते. २०१६ पासून कृष्णा अभिषेक आणि गोविंदा यांच्यात कौटुंबिक वाद सुरू आहेत. जेव्हा गोविंदाने 'द कपिल शर्मा शो'मध्ये हजेरी लावली, तेव्हा कृष्णाने त्या एपिसोडमधून काढता पाय घेतला होता.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top