पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकने केलं भारतीय सेनेवर आक्षेपार्ह ट्वीट

वृत्तसंस्था
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

मोदी सरकारच्या  कलम 370 हटवण्याच्या ऐतिहासिक पावलानंर पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकने एक आक्षेपार्ह ट्वीट करत लिहिलं आहे की, 'काश्मीर आणि काश्मिरींच्या विरुद्ध भारतीय सेनेकडून केल्या जाणाऱ्या अत्याचारासाठी...' आणि तिने त्यासोबत एक फोटो शेअर केला आहे.

मुंबई : मोदी सरकारच्या  कलम 370 हटवण्याच्या ऐतिहासिक पावलानंर पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकने एक आक्षेपार्ह ट्वीट करत लिहिलं आहे की, 'काश्मीर आणि काश्मिरींच्या विरुद्ध भारतीय सेनेकडून केल्या जाणाऱ्या अत्याचारासाठी...' आणि तिने त्यासोबत एक फोटो शेअर केला आहे.

वीणा मलिकसारख्या व्यक्तिकडून समजूतदारपणाची अपेक्षा करणं व्यर्थ आहे. तिच्या या ट्वीटमुळे लोकांचा पारा चढला. यानंतर काही मिनिटांतच वीणाला तिच्या या ट्वीटवर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यास सुरवात झाली आहे. काही लोकांनी वीणाला तिने भारतात घालवलेला वेळ आणि केलेलं काम लक्षात आणून दिलं. तर काहींनी तिला तिचं स्वयंवराची आठवण करून दिली आहे.
 

काही नेटकऱ्यांनी तिला भारतात येण्याचा सल्ला दिला. पहिल्यांदा वीणा लाइमलाइटमध्ये तेव्हा आली जेव्हा तिने भारत- पाकिस्तान सामन्यात झालेल्या मॅच फिक्सिंगबद्दल खुलासे केले. यानंतर ती बिग बॉसमध्ये दिसली. या शोमुळे तिला भारतात तुफान प्रसिद्धी मिळाली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kashmir article 370 veena malik tweet against indian army and government