काश्मीरच्या खोऱ्यातील हिंदू गेले कुठे? दिग्दर्शक अग्निहोत्रींचा सवाल

Kashmir Files : "काश्मीर हिंदूंची जमीन, तिथे आज हिंदू का नाहीत?"
Vivek Agnihotri
Vivek AgnihotriTeam eSakal
Updated on

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा काश्मीर फाईल्स हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. अनेकांना हा चित्रपट वास्तववादी वाटला तर अनेकांनी हा टित्रपट एका धर्माच्या लोकांना लक्ष्य करणारा वाटला. याच पार्श्वभूमीवर 'सकाळ'ने चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्णिहोत्री, अभिनेत्री पल्लवी जोशी आणि अभिनेता दर्शन कुमार यांच्याशी संवाद साधला. काश्मिरी पडिंतांच्या वेदना लोकांना समजाव्या या हेतूनं हा चित्रपट तयार केल्याचं दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी सांगितलं.

Vivek Agnihotri
गुजरातमध्ये 'काश्मीर फाईल्स' TAX FREE

काश्मिरमध्ये मागच्या काही दशकांत काश्मिरी पंडितांवर झालेला अत्याचार आणि त्यानंतर काश्मिरी पंडितांनी केलेलं पलायन यावर आधारित असलेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. तर दुसरीकडे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्या देखील सापडलाय. दरम्यान, दिग्दर्शकांनी हा विषय का निवडला? प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माने या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी पैसे मागितले का? जम्मू काश्मीरमध्ये नेमकं या कलाकारांना चित्रपट तयार करत असताना काय दिसलं? जेएनयू विद्यापीठाचं नकारात्मक चित्र या चित्रपटात तयार करण्यात आलंय का असे अनेक प्रश्न यावेळी चित्रपटाच्या या टीमला विचारले. यावेळी चित्रपटाचे दिगर्शक विवेक अग्नीहोत्री म्हणाले, की जोपर्यंत आपण काश्मिरी पंडितांवर हा अत्याचार झाला हे जोपर्यंत आपण म्हणत राहू तोपर्यंत हे सर्व होत राहील. आपल्याला असं म्हणावं लागेल की, हे भारतीयांसोबत झालं आहे. त्यापेक्षाही पुढे जाऊन आपल्याला हे म्हणावं लागेल की, माणसांसोबत हे सगळं घडलं होतं असं म्हणावं लागेल.

विवेक अग्निहोत्री पुढे म्हणाले, की मला हे आधीच माहिती होतं की, या चित्रपटावरून वाद होतील, माझ्यावर टीका होईल. जेव्हा सत्या समोर आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा हे होतंच. सर्व विचार करत होते, हा माणूस काय चित्रपट तयार करेल? आपण राजा आहोत, हा माणूस रंक आहे? आता मला ट्रोल केलं जाईल, माझं चरित्र बदनाम करण्याचा प्रयत्न होईल. मात्र या सर्वांना हा प्रश्न पडला पाहिजे की, काश्मिर जी हिंदूंची जमीन आहे तिथे आज हिंदू का नाही? असा सवालही विवेक अग्निहोत्रींनी उपस्थित केला आहे.

Vivek Agnihotri
"काश्मिरी हिंदूंच्या वेदना दाखवणारा सिनेमा काढण्याचा प्रयत्न केला तर .."

काश्मीरी पंडितांवर फक्त अत्याचार झाले नाही, तर तो नरसंहार होता. काश्मिरचं हे दु:ख देशाला समजावं या हेतूनं हा चित्रपट तयार केला आहे. त्यामुळे लोकांनी हा चित्रपट पाहावा. सध्याच्या भारताने तरी या मुद्दाची दखल घेतली पाहिजे. या विषयाकडे पाहताना वेगवेगळे दृष्टीकोण दिसून येतात. यामध्ये एक दृष्टीकोण काश्मिरी पंडितांचा आहे, एक दहशतवाद्यांचा आहे, तर एक समाजवादाच्या गप्पा मारणाऱ्या लोकांचा आहे. अशाच एक जेएनयुमध्ये प्राध्यापक असलेल्या समाजवादी विचाराच्या महिलेची भुमिका आपण केल्याचं पल्लवी जोशी म्हणाल्या.

Vivek Agnihotri
'गुजरात दंगलीवरील चित्रपटाला कुत्रंही गेलं नसतं' KRK संतापला

हिंदी चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये आपल्या अभिनयाच्या माध्यमातून वेगळी छाप उमटवणारा अभिनेता दर्शन कुमार या चित्रपटा या चित्रपटात जेएनयुच्या एका विद्यार्थ्याच्या भुमिकेत आहे. त्यांनीही आपल्याला हा चित्रपट दु:ख वाटणारा असल्याचं सांगितलं. आजच्या युवकांशी संबंधित मुद्दा असून, अनेक तरुण आज सत्य शोधण्याचा प्रयत्न करतात, मात्र जेव्हा त्यांना ते सत्य सापडत नाही, तेव्हा तो अस्वस्थ होतो. तशीच अवस्था असणाऱ्या एका तरुणाची मी भुमिका करत असल्याचं दर्शन कुमार यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com