Kasturi Marathi Movie : 'पोस्टमार्टेम' करणाऱ्या मुलांच्या आयुष्याची गोष्ट सांगणारा 'कस्तुरी' ३ नोव्हेंबर रोजी होणार प्रदर्शित!

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा कस्तुरी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे.
Kasturi Marathi Movie 3 Vinod Kamble
Kasturi Marathi Movie 3 Vinod Kambleesakal

Kasturi Marathi Movie 3 Vinod Kamble : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा कस्तुरी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कस्तुरी हा चित्रपट वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत आला आहे. त्याची कथाच मुळी प्रचंड अस्वस्थ करणारी आहे. हिंदीत पहिल्यांदाच अशा प्रकारच्या कथेवर चित्रपट बनवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.

कस्तुरीच्या बाबत आणखी सांगायचे झाल्यास, 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट बाल चित्रपटाचा पुरस्कार या चित्रपटाला मिळाला होता. येत्या 3 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. इनसाइट फिल्मची निर्मिती असलेला हा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि अनुराग कश्यप हे प्रस्तुत करत आहेत.

झोप उडवणारी टेक्नॉलॉजीच मिळवून देणार 'स्मार्ट झोप'..!!

विनोद कांबळे यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. एक उल्लेखनीय बाब अशी की चित्रपटाचे निर्माते,दिग्दर्शक,मुख्य कलाकार यांचा हा पहिला चित्रपट असूनही थेट राष्ट्रीय पुरस्कारांपर्यंत बाजी मारली. या सोबतच हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कारासहित अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये निवडला गेला होता. तिथेही कस्तुरी या चित्रपटाचे खूप कौतुक करण्यात आले तसेच चित्रपटाला अनेक पुरस्कारही मिळाले.

Kasturi Marathi Movie 3 Vinod Kamble
Kasturi Movie : 'स्वच्छतादिना'च्या निमित्तानं नागराजनं अनुराग कश्यपसोबत केली मोठी घोषणा! 'आता लवकरच...'

कस्तुरी हा सिनेमा सनी चव्हाण नावाच्या एका पोस्टमार्टम करणाऱ्या मुलाच्या सत्य घटनेवर आधारित असून बार्शी मधील कथा आहे. आपल्या अंगाचा वास येऊ नये म्हणून कस्तुरीच्या अत्तराचा शोध घेणाऱ्या दोन मित्रांची धडपड या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. खरं पाहायला गेलं तर समाजातील एक पारंपारिक काम करणाऱ्या मुलाला पारंपारिक काम करण्यासाठी शिक्षण सोडून द्यावे लागते. कोवळ्या स्वप्नांना नवीन पालवी फुटत असताना ही मुलं आर्थिक व सामाजिक कारणामुळे शिक्षणापासून वंचित राहतात.

Kasturi Marathi Movie 3 Vinod Kamble
Ganapath Movie Review : टायगरच्या माकडउड्यांचा 'फुसका गणपत', आजारी पडलेली कथा अन् बरचं काही!

आपली ओळख आपल्या कामावर ठरत नाही ती आपण काय काम करतो आणि कशाप्रकारे काम करतो यावर ठरते. शिक्षण हे असे माध्यम आहे की ज्यातून माणसात सकारात्मक परिवर्तन घडून येते. पारंपारिक कामामुळे शिक्षणापासून दूर ढकलले गेलेल्या परंतु शिक्षणाची ओढ असणाऱ्या पोस्टमार्टम करणाऱ्या सत्य घटनेवर आधारित अशा एका मुलाची गोष्ट आहे.

एकूण आठ महिलांनी एकत्र येऊन सिनेमाची निर्मिती केली असून चित्रपटाचे पोस्टरही प्रदर्शित होत आहे .तसेच समाज माध्यमांमध्ये चित्रपटाचे प्रमोशन सुरू आहे. या चित्रपटामध्ये समर्थ सोनवणे मुख्य भूमिकेत असून श्रवण उपळकर सह अभिनेत्याच्या भूमिकेत आहे. वैशाली केंदळे , सेजल भालके, अनिल कांबळे, विजय शिंदे, मलसिद्ध देशमुख ,अजय चव्हाण , कुणाल पवार , साजिद बागवान हे देखील सह कलाकार म्हणून चित्रपटात आहेत.

Kasturi Marathi Movie 3 Vinod Kamble
Shah Rukh Khan: 'यापुढे मी कधीही...' ती गोष्ट सांगून शाहरुखनं चाहत्यांना केलं निराश, काय म्हणाला किंग खान?

अभय चव्हाण यांनी निर्मिती प्रमुख म्हणून काम पाहिले असून चित्रपटाचे सहलेखन व वेशभूषा शिवाजी करडे यांनी केलं आहे. छायाचित्रण - मनोज काकडे , संकलन - श्रीकांत चौधरी कला दिग्दर्शन- अतुल लोखंडे , रंगभूषा /केशभूषा - सुरेश कुंभार , पार्श्व संगीत - विजय शिंदे, साऊंड डिझाईनिंग - शोएब मणेरी , निर्मिती सहाय्यक - महेश शिरसागर , लाईन प्रोडूसर - विजय शिखरे VFX- पंकज सोनवणे यांनी केलं आहे. येत्या 3 नोव्हेंबर रोजी कस्तुरीचा गंध संपूर्ण महाराष्ट्रभर नाही तर देशभर पसरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com