Katrina Kaif: 'हाऊज द जोश'? कतरिनाचाच प्रश्न, मिळालं भन्नाट उत्तर! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Katrina Kaif

Katrina Kaif: 'हाऊज द जोश'? कतरिनाचाच प्रश्न, मिळालं भन्नाट उत्तर!

Katrina Kaif Video Viral: बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ आता चर्चेत आली आहे. तिचा येत्या दिवसांत फोन भूत नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्याच्या प्रमोशनमध्ये ती व्यस्त आहे. एका ठिकाणी प्रमोशनसाठी गेली असताना कतरिनानं विचारलेला तो प्रश्न आता चर्चेत आला आहे. त्यावरुन तिला नेटकऱ्यांनी छेडले आहे. तिच्यावर वेगवेगळ्या कमेंट करुन तिची फिरकी घेतली आहे.

विकीनं देखील तो व्हिडिओ पाहिल्यावर कशाप्रकारे प्रतिक्रिया दिली असेल असा प्रश्न नेटरकऱ्यांना पडला आहे. त्यांनी त्यावरुन कतरिनाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. बॉलीवूडमध्ये कायम लाईमलाईटमध्ये असणारे कपल्स म्हणून कतरिनाचे नाव घेतले जाते. त्यांच्या पोस्ट, व्हिडिओ आणि फोटो यांना मिळणारा प्रतिसादही मोठा असल्याचे दिसून आले आहे. अशावेळी कतरिनाचा तो एक प्रश्न आणि नेटकऱ्यांनी तिचा घेतलेला क्लास लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

कतरिनाचा तो प्रमोशनल व्हिडिओ आहे. त्यामध्ये तिनं उपस्थित प्रेक्षकांशी संवाद साधला आहे. तो साधत असताना आपल्या पतीच्या चित्रपटातील एक संवाद हाऊ ज द जोश...असं तिनं विचारताच तिला उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. त्यावेळी त्यांनी येस सर असे म्हणताच, कतरिनानं त्यांना येस मॅडम म्हणण्याची आठवण करुन दिली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी मात्र कतरिनाला शेलक्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा: Swara Bhasker: 'याच्यापेक्षा मोठं...' ट्रोलर्सला उत्तर देताना स्वरा भलतचं बोलली

गेल्या काही दिवसांपासून कतरिनाचा फोन भूत नावाचा चित्रपट चर्चेत आला आहे. त्यामध्ये कतरिना एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. हाऊज द जोश असे तिनं विचारताच चाहत्यांनी मात्र कतरिनाला हाय सर...असे म्हणून छेडले आहे. तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरुन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे.

हेही वाचा: Shweta Tiwari: वय नाही 'सौंदर्य' पाहायचं!