सेल्फ क्वारंटाईनमध्ये भांडी घासल्यानंतर आता कतरिना कैफ काढतेय झाडू..

katrina kaif
katrina kaif

मुंबई- कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे..ज्यामुळे प्रत्येकजण सध्या घरातंच आहे...आता घरी राहून राहून अनेक जण कंटाळले आहेत..सामान्य माणसांपासून ते दररोज शूटमध्ये व्यस्त असणा-.या सेलिब्रिटींपर्यंत सगळेच घरात बसून कंटाळले आहेत...घरी बसल्यावर काय करावं हे कोणालंच सुचत नाही आहे..म्हणूनंच घरात बसलेले सेलिब्रिटी त्यांच्या चाहत्यांना घरात काही ना काही करुन एंटरटेन करताना दिसत आहेत..त्यात आता पुन्हा कतरिनाचा नवा व्हिडिओ समोर आला आहे..

भांडी घासण्याच्या ट्रेनिंगनंतर आता कतरिना कैफचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे..या व्हिडिओमध्ये कतरिना लादीवरील केर-कचरा काढताना दिसत आहे..कतरिनाने इंस्टाग्रावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती घरातील साफ सफाई करताना दिसून येत आहे..आणि या व्हिडिओमध्ये तिची बहीण मागून कोमेंट्री करत आहे..हा व्हिडिओ बहीण इजाबेलने शूट केला आहे आणि याची माहिती खुद्द कतरिनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन दिली आहे..कतरिनाने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शन दिलंय, 'या परिस्थितीत सगळेजण आपापल्या हिस्स्याचं काम करत आहेत.कोणी एक काम करत आहे तर कोणी दूसरं..'

कतरिनाचा हा व्हिडिओ दोन भागात आहे..पहिल्या भागात ती एकदम गंभीर होऊन घरातील साफ सफाई करताना दिसत आहे तर दुस-या भागात कतरिना तिच्या झाडूचा बॅट सारखा वापर करत आहे..

कतरिना पहिल्यांदाच सोशल मिडीयावर असा मजेशीर व्हिडिओ पोस्ट करत नाही आहे तर याआधीही कतरिनाने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये ती  कमी पाण्यात कशी भांडी धूतली पाहिजेत हे सांगत होती..

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

really makes u appreciate all the help we have at home #socialdistancing #staysafe #helpoutathome

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की कशी कतरिनाने आधी सिंकमध्ये पाणी जमा करुन त्यात भांडी साफ करुन घेतली आहेत.त्यानंतर डिशवॉशच्या सहाय्याने ती स्वच्छ घासली आणि मग सगळी भांडी एकत्र स्वच्छ पाण्यात धुवून बाजूला ठेवली आहेत..

katrina kaif chores at her home watch latest video coronavirus lockdown  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com