Katrina-Vicky: विकीच्या सवयीनं कतरिना वैतागली! बेडरुम सिक्रेट्स व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Katrina-Vicky

Katrina-Vicky: विकीच्या सवयीनं कतरिना वैतागली! बेडरुम सिक्रेट्स व्हायरल

Katrina-Vicky: बॉलीवूडचे सर्वात लोकप्रिय जोडपे म्हणून कतरिना आणि विकी कौशलचे नाव घेतले जाते. त्यांच्या लग्नाची चर्चा बराचकाळ सोशल मीडियावर चर्चेत होती. बॉलीवूडमध्ये या दोन्ही सेलिब्रेटींनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्याच्या घडीला सर्वात लोकप्रिय अभिनेता म्हणून विकीचे नाव घ्यावे लागेल. त्यानंतर कतरिना देखील वेगवेगळ्या चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते आहे.

कतरिनानं एका मुलाखतीमधून काही धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ती मुलाखत आता सोशल मीडियावर व्हायरलही झाली आहे. विकी आणि कतरिनाची यंदाची पहिली दिवाळी आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट केले असून चाहत्यांनी त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. यापूर्वी कतरिनाच्या करवा चौथच्या फोटोंवरही नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या होत्या.

कतरिना सध्या तिच्या आगामी फोन भूत नावाच्या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. त्यामध्ये तिच्यासोबत ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर व्हायरल झाला होता. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. त्यानिमित्तानं एका मुलाखतीमध्ये कतरिनानं सासरी आपल्याला कोणत्या नावानं बोलावले जाते, रात्री विकी आपल्याशी कसा संवाद साधतो हे सांगून चाहत्यांना धक्कादायक माहिती दिली आहे.

तिनं त्या मुलाखतीमध्ये सांगितलं की, तो पती म्हणून चांगलाच आहे. पण त्याच्या काही सवयी अशा आहेत की त्याचा मला त्रास होतो. त्याचे ते गाणं गाणे, नाच करणे हे माझ्या डोक्यात जाते. त्याची ती आवड आहे. पण मला ते आवडत नाही. तो एक चांगला गायक आहे. पण मला जेव्हा झोप येत नाही तेव्हा तो मला गाणं म्हणून झोपवतो. विकी हा खुप हट्टी आहे. आपण त्याला एखादी गोष्ट करु नको म्हटलं तर तो ती हटकून करणार.

हेही वाचा: Prasad Vedpathak Tweet: 'मी एकवेळ माफ करेन पण बायकोच्या नादी लागू नका'

मला घरात सगळे किट्टो म्हणून हाक मारतात. कतरिनाचा फोन भूत हा येत्या 4 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती एक हॉरर कॉमेडी असून त्यात कतरिनानं त्यात एका चेटकीणीची भूमिका केली आहे.

हेही वाचा: Prasika Vedpathak: 'जळू नका, बरोबरी करा!' नवऱ्याचा अपमान करणाऱ्यांना झापलं