कतरिना कैफनं सलमान खानला शुभेच्छा देत म्हटलं,''तुझ्यासोबत कायम...'' Katrina Kaif | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Katrina Kaif, Salman Khan

कतरिना कैफनं सलमान खानला शुभेच्छा देत म्हटलं,''तुझ्यासोबत कायम...''

आज सलमान खानचा(Salman Khan) ५६ वा वाढदिवस...त्याचा हा वाढदिवस विशेष लक्षात राहिला तो म्हणजे त्याला वाढदिवसाच्या दोन दिवस आधी झालेल्या सर्पदंशामुळे. एरव्ही सलमान खानचा वाढदिवस त्याच्या स्टारडममुळे नेहमीच चर्चेत असतो पण यावर्षी सर्पदंशामुळे त्याच्या वाढदिवसाच्या दिवसाला अधिक प्रसिद्धिचं वलंय लाभलं हे मात्र तितकंच खरंय. त्याच्या पनवेल येथील फार्महाऊसवर तो त्याचे कुंटुंबिय आणि मित्रपरिवारासोबत वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी गेला असताना तिथे त्याला साप चावला पण तो साप विषारी नसल्यामुळे सलमान बचावला. त्यानं बरा झाल्यानंतर बर्थ डे सेलिब्रेट केला आणि माध्यमांसमोर प्रतिक्रियाही दिली.

Katrina Kaif Instagram Post

Katrina Kaif Instagram Post

त्याच्यासोबत बर्थ डे सेलिब्रेट करण्यासाठी बॉलीवूडमधीलही काही मंडळी उपस्थित होती. अभिनेता बॉबी देओल,सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान,सलमानची एक्स-गर्लफ्रेंड संगीता बिजलानी यांसोबत अनेक मंडळी खास मुंबईहून सलमानला भेटून शुभेच्छा देण्यासाठी पनवेलमध्ये दाखल झाली आहेत. पण यांच्यासोबतच सलमानसाठी त्याच्या फेव्हरेट कतरिना कैफनेही(Katrina Kaif) दिलेल्या शुभेच्छा चर्चेत आहेत. कतरिनानं नुकतंच अभिनेता विकी कौशलसोबत लग्न केलंय. ती सध्या त्याच्यासोबत ख्रिसमस सेलिब्रेशनमध्ये बिझी आहे. पण यातनंही वेळ काढत तिनं आपल्या जुन्या मित्राला म्हणजेच सलमान खानला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा: ''या हसण्यामागे मोठं दुःख दडलेलं आहे'';सलमानची ही प्रतिक्रिया चर्चेत

तिनं आज आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सलमान खानला शुभेच्छा देणारी पोस्ट केली आहे. तिनं सलमानला म्हटलंय,''तुझ्या आयुष्यात आनंद आणि यश कायम राहू दे''. आता लग्नानंतर सलमानसाठी पहिल्यांदाच कतरिना सोशल मीडियावर व्यक्त झाली आहे. त्यामुळे तिची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. कतरिनाला सलमाननं बॉलीवूडमध्ये टिकण्यासाठी खूप सहकार्य केलंय हे तर कोणापासून लपलेलं नाही. काही वर्ष का होईना ते दोघे रीलेशनशीपमध्ये होते हे ही सर्वांना माहित आहे. त्यामुळे लग्नानंतरची तिची सलमानसाठीची ही पोस्ट चर्चेत आली नसती तर नवलंच. आता सलमान त्या पोस्टवर कसा रीअॅक्ट होतोय हे पहायचं. सलमान आणि कतरिना २०२२ मध्ये प्रदर्शित होणा-या 'टायगर ३' सिनेमात आपल्याला दिसणार आहेत. नुकतंच ते या सिनेमाचं एका शेड्युलंच शुटिंग पूर्ण करून मुंबईत परतले आहेत.

Web Title: Katrina Wishes Salman Khan Post Viral Entertainment

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top