KBC14: केबीसीच्या मंचावर अमिताभनी का मागितली विनोद खन्ना यांची माफी? म्हणाले, '44 वर्षांपूर्वी...'

हॉट सीटवर बसलेल्या स्पर्धकानं एक जुना किस्सा आठवण करुन दिल्यानंतर अमिताभनी विनोद खन्ना यांची सर्वांसमक्ष नॅशनल टेलीव्हिजनवर माफी मागितली.
Kaun Banega Crorepati 14 Amitabh Bachchan, Vinod Khanna fight on set muqaddar ka sikandar Movie
Kaun Banega Crorepati 14 Amitabh Bachchan, Vinod Khanna fight on set muqaddar ka sikandar MovieGoogle

KBC 14: 'कौन बनेगा करोडपती' चा १४ वा सिझन सुरू झाला आहे आणि हा सिझन देखील अमिताभ बच्चन होस्ट करत आहेत. यंदाचा सिझन जोरदार चर्चेत आहे. बिग बी हॉट सीटवर बसणाऱ्या स्पर्धकांना ना केवळ प्रश्न विचारतात, तर अनेकदा वेगळ्या गप्पा देखील इथं रंगताना दिसतात.

यावेळी अमिताभ यांच्यासमोर सूरज दास बसले होते,त्यांनी ४४ वर्षापूर्वी रिलीज झालेल्या 'मुकद्दर का सिकंदर' सिनेमाशी संबंधित असा प्रश्न विचारला,ज्यानंतर अमिताभना चक्क माफी मागावी लागली. त्यांनी ही माफी दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांच्याशी मागितली. चला,जाणून घेऊया याविषयी सविस्तर.(Amitabh Bachchan, Vinod Khanna fight on set muqaddar ka sikandar Movie)

Kaun Banega Crorepati 14 Amitabh Bachchan, Vinod Khanna fight on set muqaddar ka sikandar Movie
Honey Singh: घटस्फोटानंतर हनी सिंग अभिनेत्री टीना थडानीच्या प्रेमात, एका ब्रेसलेटनं खोललं गुपित

सूरज दास यांनी अमिताभ बच्चनना विचारले की, त्यांनी कुठेतरी वाचलं होतं की 'मुकद्दर का सिकंदर' या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान अमिताभ यांनी विनोद खन्ना यांच्यावर ग्लास फेकून मारला होता,ज्यामुळे त्यांना जखम होऊन १६ टाके देखील पडले होते. सूरज यांनी बिग बी ना विचारले की, 'हे मी योग्य बोलत आहे का?' यावर अमिताभ म्हणाले, ''होय सर,तुम्ही अगदी योग्य बोलत आहात. माझ्याकडून ती चूक झाली होती. बारमध्ये उभे राहून आमचं मद्यपान सुरु होतं...'' बिग बी आपलं वाक्य पूर्ण करत नाहीत तोवर सूरज म्हणाले,'हो,हो..हेच बोलायचं होतं मला'.

Kaun Banega Crorepati 14 Amitabh Bachchan, Vinod Khanna fight on set muqaddar ka sikandar Movie
Janhvi Kapoor च्या चेहऱ्यावर होत्या मिश्या, म्हणाली,'ते दिवस माझ्यासाठी खूपच...'

यानंतर अमिताभ बच्चन पुढे म्हणतात की, ''अरे तुम्हाला इतकं सगळं माहितीय तर उगाचच सगळ्यांसमोर कशाला बोलताय मला''. बिगी बी यांचा हा अंदाज तिथं बसलेल्या प्रेक्षकांना भलताच भावला. त्यांनतर बिग बी यांना आणखी एक प्रश्न सूरज विचारतात. सूरज विचारतात की, 'मुकद्दर का सिकंदर च्या वेळेस तुम्हाला एका सीनमध्ये बाईक चालवायची होती. तेव्हा तुम्ही रिहर्सल करण्यासाठी जुहू ते बान्द्रा रोज बाईक चालवण्याची प्रॅक्टिस करायचात. तेव्हा खूप महिला तुमचा पाठलाग करायच्या'. हे ऐकून दोन मिनिटं अमिताभना काय बोलावे सुचेना. ते विनोदानं म्हणाले,' हे कोणी सांगितलं तुम्हाला?' तेव्हा सूरज म्हणाले,'त्यांनी हे गूगलवर वाचलं'. इतकंच नाही तर सूरज पुढे म्हणाले,'आजही महिला तुमचा पाठलाग करतात'. हे ऐकल्यावर बिग बी यांनी लगेच मागे पाहिलं आणि जोरजोरात हसायला लागले.

'मुकद्दर का सिकंदर' हा सिनेमा ४४ वर्षांपूर्वी १९७८ साली रिलीज झाला होता. या सिनेमाला प्रकाश मेहरानं दिग्दर्शित केलं होतं. कादर खान, विजय कौल आणि लक्ष्मीकांत शर्मा यांनी सिनेमा लिहिला होता. अमिताभ बच्चन आणि प्रकाश मेहरा यांनी एकत्रित केलेला तो ९ वा सिनेमा होता. या सिनेमात अमिताभ सोबत विनोद खन्ना, राखी, रेखा,रंजीत, अमजद खान यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. निरुपा रॉय आणि कादर खान यांच्या देखील छोट्या भूमिका त्यात होत्या. सिनेमात सिकंदरची(अमिताभ बच्चन) कथा दाखवण्यात आली होती. ज्या मध्यवर्ती भूमिकेत अमिताभ बच्चन होते. हा सिनेमा बंगाली पुस्तक देवदास(१९१७) वर आधारित होता.

Amitabh Bachchan, Vinod Khanna fight on set muqaddar ka sikandar Movie
Amitabh Bachchan, Vinod Khanna fight on set muqaddar ka sikandar MovieGoogle

माहितीनुसार,सिनेमाच्या शूटिंग दरम्यान अमिताभ बच्चन यांना विनोद खन्ना यांच्यावर ग्लास फेकून मारायचा होता आणि विनोद खन्ना यांना त्याप्रसंगी स्वतःला त्यापासून वाचवण्यासाठी खाली वाकायचं असतं. जसं दिग्दर्शकानं अॅक्शन म्हटलं,तसं बिग बी यांनी एकदम आवेशानं ग्लास फेकला. पण विनोद खन्नांचे टायमिंग चुकले आणि ते वेळेत खाली वाकू शकले नाहीत आणि तो ग्लास त्यांच्या हनुवटीला जोरदार लागला. विनोद खन्ना यांची ती जखम एवढी मोठी होती की त्यांना १६ टाके पडले.

Kaun Banega Crorepati 14 Amitabh Bachchan, Vinod Khanna fight on set muqaddar ka sikandar Movie
Vaishali Takkar Suicide Case: अखेर पोलिसांच्या तावडीत वैशालीचा आरोपी, असा रचला होता सापळा...

बोललं जातं की या घटनेनंतर अमिताभ खूप घाबरले होते. त्यांनी लगेच विनोद खन्ना यांची माफी मागितली होती,पण या घटनेनंतर म्हणे त्या दोघांमध्ये थोडा दुरावा निर्माण झाला. अगदी विनोद खन्ना यांनी त्यानंतर अमिताभ बच्चन यांच्यासोबत पुन्हा काम न करण्याचा निर्णय घेतल्याचं देखील समोर आलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com