'काय घडलं त्या रात्री?' मालिका सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यु प्रकरणावर आधारित? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kay ghadla tya ratri

मालिकेचा प्रोमो रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या मालिकेच्या निमित्ताने अभिनेत्री मानसी साळवी तब्बल १३ वर्षांनंतर पुन्हा एकदा स्मॉल स्क्रीनवर झळकण्यासाठी सज्ज झालीये.

'काय घडलं त्या रात्री?' मालिका सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यु प्रकरणावर आधारित?

मुंबई- 'काय घडलं त्या रात्री?' या मालिकेचा प्रोमो रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या मालिकेच्या निमित्ताने अभिनेत्री मानसी साळवी तब्बल १३ वर्षांनंतर पुन्हा एकदा स्मॉल स्क्रीनवर झळकण्यासाठी सज्ज झालीये. या मालिकेत मानसी  एक आयपीएस ऑफीसर रेवती बोरकरची भूमिका साकारताना दिसणार आहे. रेवती केवळ एक आयपीसएस ऑफीसर नाहीये तर ती  एक तत्वनिष्ठ आयपीएस ऑफीसर आहे जी बदलत्या परिस्थितीत देखील आपल्या तत्वांशी एकनिष्ठ असते. कायदा, आदेश आणि न्याय यांचं पालन आणि आदर करत पोलीस खातं, नागरिक, राज्य आणि आपला देश यांच्याप्रती आपलं काम चोख बजावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं यामध्ये दाखवण्यात आलं आहे. मात्र सगळ्यात एक चर्चा होताना दिसतेय ती म्हणजे या मालिकेची कथा.

Lookback 2020: सिने इंडस्ट्रीतील 'या' कलाकारांनी २०२० मध्ये घेतला जगाचा निरोप

'काय घडलं त्या रात्री?' या मालिकेच्या प्रोमोमधून कळतंय की एका सुपरस्टार सेलिब्रिटीची मृत्यु झाला आहे. सुरुवातीला ती आत्महत्या असल्याचं समोर येतं मात्र कालांतराने ती आत्महत्या नसून हत्या असल्याचा अंदाज वर्तवला जातो. एवढा मोठा सेलिब्रिटी आत्महत्या कसा करु शकतो? आत्महत्याच असेल तर त्यामागे नेमकं काय कारण असेल अशा अनेक प्रश्नांची उत्तर या मालिकेतून हळूहळू उलगडत जातील.

मात्र तुम्हाला ही घटना नुकतीच ऐकल्यासारखी वाटतेय का? तर हो. या मालिकेची कथा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आयुष्याशी संबधित असल्यासारखं वाटतंय. सुशांतने देखील प्रसिद्धीच्या झोतात असताना असं पाऊल का उचललं असेल की त्याची हत्या आत्महत्या म्हणून दाखवली असेल असा प्रश्न त्याच्या चाहत्यांच्या मनात होता. तीच परिस्थिती या प्रोमोमध्ये देखील दिसून येतेय . त्यामुळे सोशल मिडियावर या मालिकेची आणि सुशांतच्या मृत्यु प्रकरणाची तुलना केली जातेय. प्रेक्षकांना देखील आता उत्सुकता आहे की या मालिकेत हे कशाप्रकारे दाखवण्यात येईल.

या मालिकेबाबतीत आणखी एक गोष्ट सांगायची झाली तर ही मालिका केवळ १०० एपिसोडची असणार असल्याचं कळतंय. १०० दिवसात या प्रकरणाचा छडा लावला जाणार आहे. याआधी देखील झी मराठीवर १०० डेज मालिकेच्या निमित्ताने असा प्रयोग करण्यात आला होता जो यशस्वी ठरला आणि प्रेक्षकांच्या देखील पसंतीस पडला होता. यामध्ये देखील असाच एका खुनाचा शोध घेण्यात आला होता. तेजस्विनी पंडित आणि आदिनाथ कोठारे यांची यात मुख्य भूमिका होती.

'काय घडलं त्या रात्री?' या मालिकेत मानसी साळवी सोबत इतर काही कलाकार आहेत. जयवंत वाडकर पोलिस अधिका-याच्या भूमिकेत आहेत तर किशोर कदम, सुशांत शेलार, स्मिता गोंदकर, विजय निकम, स्मिता लिमये, चेतन वडनेरे हे सहा संशयितांच्या भूमिकेत दिसून येत आहेत. ३१ डिसेंबर पासून सुरु होणा-या या मालिकेत मृत्यु प्रकरणाचा छडा लावून त्या कलाकाराला न्याल मिळणार, की हे प्रकरण कायम गुढ राहणार हेच प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे.  

kay ghadala tya ratri upcoming serial promo It feels slightly inspired from sushant singh rajput case    

Web Title: Kay Ghadala Tya Ratri Serial Promo Feels Slightly Inspired Sushant Singh Rajput

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..