सलमान खानची कोविड-१९ टेस्ट निगेटीव्ह, सुरु करणार 'बिग बॉस'चं शूटिंग

दिपाली राणे-म्हात्रे
Friday, 20 November 2020

कोरोना संक्रमित झालेल्या कर्मचा-यांना मुंबईतील एक हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं आहे. मात्र याबाबतीत सलमानच्या कुटुंबाकडून अजुन कोणतही अधिकृत स्टेटमेंट आलेलं नाही.

मुंबई- बॉलीवूडचा दबंग सलमान खानने त्याच्या ड्रायव्हर आणि दोन कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाल्याचं कळताच स्वतःला आयसोलेट केलं होतं. सलमान आणि त्याचे कुटुंबिय या कारणामुळे काळजीत पडले होते. यासाठी सलमानने लगेचच त्याची कोविड-१९ टेस्ट केली होती. आता या टेस्टचे रिपोर्ट आले असून सलमानच्या चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे त्याचे कोरोना टेस्टचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. 

हे ही वाचा: 'जुग जुग जियो'मध्ये दिसणार वरुण आणि कियाराची जबरदस्त केमिस्ट्री  

सलमानला जसं त्याच्या कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली हे कळालं तेव्हा पिंकविलाने दिलेल्या रिपोर्टनुसार, सलमान आणि त्याचे कुटुंबिय आयसोलेट झाले होते. कोरोना संक्रमित झालेल्या कर्मचा-यांना मुंबईतील एक हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं आहे. मात्र याबाबतीत सलमानच्या कुटुंबाकडून अजुन कोणतही अधिकृत स्टेटमेंट आलेलं नाही. यादरम्यान आत्तापर्यंतच्या रिपोर्टनुसार सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांची कोरोना टेस्ट निगेटीव्ह आली आहे.

सलमानच्या चाहत्यांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे कारण आत्ता तो 'बिग बॉस १४' च्या शूटिंगला देखील सुरुवात करणार आहे. सलमान खान 'बिग बॉसचा १४' वा सिझन होस्ट करत आहे. सलमान आणि त्याच्या चाहत्यांना प्रश्न पडला होता की आता बिग बॉसच्या शूटिंगला सलमान हजर राहणार की नाही. मात्र सलमानचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने त्याचे चाहते खुश आहेत. खबरदारी म्हणून बीएमसीने सलमानच्या घराची सफाई केली आहे. बॉलीवूड कलाकार शूटिंगमुळे अनेकजणांच्या संपर्कात येत असतात. त्यामुळे सेटवरिल देखील खबरदारी घेतली जात आहे. 

salman khan covid 19 test report negative will start bigg boss shoot soon 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: salman khan covid 19 test report negative will start bigg boss shoot soon