'तुम्ही GST भरला का?'; स्पर्धकाच्या प्रश्नावर बिग बींची भन्नाट प्रतिक्रिया

GST विभागात काम करणाऱ्या संध्या या हॉटसीटवर बसल्या होत्या.
amitabh bachchan
amitabh bachchan

KBC 13 : 'कौन बनेगा करोडपती १३'च्या नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये टॅक्स इन्स्पेक्टर संध्या मखिजा या हॉटसीटपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरल्या. हॉटसीटवर सूत्रसंचालक अमिताभ बच्चन Amitabh Bachchan यांच्यासमोर बसल्यानंतर संध्या यांनी त्यांच्या कामाचं नेमकं स्वरूप काय असतं, याबद्दल सांगितलं. यावेळी संध्या यांनी 'तुम्ही जीएसटी भरला का', असा प्रश्न बिग बींना अचानक विचारला. त्यावर चकित झालेल्या बिग बींनीही त्यांना भन्नाट उत्तर दिलं.

राजकोटच्या संध्या मखिजा या राज्य कर निरीक्षक आहेत. राज्य कर निरीक्षकाचं नेमकं काम काय असतं असा प्रश्न बिग बींनी त्यांना विचारला. त्यावर त्या म्हणाल्या, "सर, मी जीएसटी विभागात राज्य कर निरीक्षक म्हणून काम करते. चांगल्या लोकांना गोष्टी सुलभ करून त्यांची मदत करणं आणि वाईट लोकांचं जगणं कठीण करणं हे माझं काम आहे. मी प्रामाणिक करदात्यांना मदत करते आणि ज्यांच्याकडे काळा पैसा आहे, त्यांच्यावर लक्ष ठेवून असते."

amitabh bachchan
दैवाने दिले; कर्माने नेले! KBC विजेता सुशील कुमारची दुर्दैवी कहाणी

संध्या यांच्या उत्तर पुढे अमिताभ म्हणतात, "म्हणजे तुम्ही वाईट लोकांना चांगलं बनवण्याचं काम करता? आणि जर लोकांनी वेळेवर जीएसटी नाही भरला तर तुम्ही त्यांना दंड भरावा लागतो, बरोबर ना?" वेळेत जीएसटी न भरणाऱ्यांना दहा हजार रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागत असल्याची माहिती संध्या यांनी बिग बींना दिली. हे सांगताना त्या अचानक बिग बींना विचारतात, "सर, तुम्ही जीएसटी भरला का?" संध्या यांचा हा प्रश्न ऐकून एका क्षणासाठी बिग बी चकीत होतात आणि आजूबाजूला पाहतात. संध्या यांना उत्तर देत ते पुढे म्हणतात, "देवीजी, जर मी जीएसटी भरला नसता, तर मला इथे बसू दिलं नसतं. तुमच्यासारख्या लोकांनी आम्हाला तुरुंगात डांबलं असतं."

केबीसीमध्ये संध्या या फक्त ४० हजार रुपयांच्या प्रश्नापर्यंतच खेळू शकल्या होत्या. मात्र त्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिल्याने त्यांना फक्त १० हजार रुपयेच घरी घेऊन जाता आलं. केबीसीचा तेरावा सिझन गेल्या महिन्यापासून सुरू झाला. केबीसीच्या १२ सिझनचं सूत्रसंचालन अमिताभ बच्चन यांनी केलं आहे. या सिझनमध्ये आतापर्यंत दोन स्पर्धकांनी एक कोटी रुपयांपर्यंतची मजल गाठली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com