केबीसीमध्ये जाणं पडलं महागात, तीन वर्षांची इंक्रिमेंट थांबवली...

केबीसीमध्ये जाणं पडलं महागात, तीन वर्षांची इंक्रिमेंट थांबवली...

मुंबई - मनोरंजन क्षेत्रामध्ये कौन बनेगा करोडपती या मालिकेनं प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळवली आहे. गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ या मालिकेनं प्रेक्षकांना आपलेसं केलं आहे. बिग बी अमिताभ बच्चन हे या कार्यक्रमाचं होस्टिंग करत आहेत. त्यांच्या निवेदनानं या शो नं लोकप्रियतेची एक वेगळी उंची गाठली आहे. सध्या ही मालिका चर्चेत आली आहे. त्याचे कारण म्हणजे या शो मध्ये सहभागी झालेल्या एकाला डिपार्टमेंटनं नोटीस पाठवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच त्याची इक्रिंमेंटही थांबवली आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

अनेकांना बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांना भेटण्याची इच्छा असते. त्याचं ते स्वप्नही असतं. कित्येकांना पैसे जिंकण्यापेक्षा त्यांना भेटणं हे जास्त महत्वाचं होतं. कोटा रेल्वे मंडळाचे एक अधिकारी देशबंधू पांडे हे कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. मात्र त्या कार्यक्रमाममध्ये सहभागी होणं महागात पडलं आहे. त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणं यामुळे त्यांना शिक्षा झाली आहे. रेल्वे प्रशासनानं त्यांच्या हातात चार्जशीट दिली आहे. एवढ्यावरच कारवाई करुन रेल्वे प्रशासन थांबलेलं नाही. तर त्यांनी तीन वर्षांची पगार वाढही थांबवली आहे.

देशबंधू हे रेल्वे प्रशासनामध्ये सुपरीटेंडट म्हणून कार्यरत आहे. ते आपल्या नोकरीच्या निमित्तानं राजस्थानातील कोटामध्ये कार्यरत होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशबंधू यांच्या हातात रेल्वे प्रशासनानं नोटीस दिली आहे. २६ आणि २७ ऑगस्टला देशबंधू हे कौन बनेगा करोडपतीच्या शो मध्ये सहभागी झाले होते. त्यांना सहा लाखांसाठी विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देता आले नव्हते. कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात सहभागी झाल्यानं त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com