ज्ञान कुठूनही मिळवा, मात्र त्याची खात्री करुन घ्या; बच्चन यांचा कानमंत्र

हेडिंग वाचून बातमी समजून घेणाऱ्यांना अमिताभ बच्चन यांचा सवाल?
Amitabh Bachchan
Amitabh BachchanGoogle

बाॅलीवूडमध्ये 'बिग बी' नावाने प्रसिद्ध असलेले अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे लवकरच लोकप्रिय गेम शो 'कौन बनेगा करोडपती' सह (KBC 14) छोट्या पडद्यावर वापसीसाठी तयार आहेत. या कार्यक्रमाच्या पूर्वीच लोकांमध्ये उत्सुकता खूपच वाढली आहे. त्याचे कारण आहे कार्यक्रमाचे आकर्षक प्रोमो व्हिडिओज. वास्तविक कार्यक्रम सुरु होण्यापूर्वीच तिचे अनेक प्रमोशनल व्हिडिओ सोनी टीव्हीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम खात्यावर शेअर केले आहे. ते लोकांना खूपच पसंतीला उतरले आहेत. (KBC 14 Amitabh Bachchan Promo Video Goes Viral)

Amitabh Bachchan
माधवनच्या 'राॅकेट्री' चित्रपटाला पाडण्याचे 'कट' कारस्थान?, पोस्टरच दिसेना

ताज्या व्हिडिओत अमिताभ बच्चन यांनी माहितीची खात्री करण्याचे महत्त्व सांगितले आहे. सोनी टीव्हीने शनिवारी शेअर केलेल्या एक नव्या प्रोमोत अमिताभ हे एका तरुण स्पर्धकासमोर बसले आहेत आणि त्याला प्रश्न विचारताना दिसतात. व्हिडिओत अमिताभ यांनी स्पर्धकाला विचारले, मी योग्य निर्णय घेण्यावर विश्वास ठेवत नाही. मी अगोदर निर्णय घेतो आणि ती योग्य असल्याचे सिद्ध करतो. हे कोण म्हणाले ? हे आहेत आपले पर्याय.. ए. बिल गेट्स, बी.रतन टाटा. अमिताभ यांनी पर्याय वाचून दाखवण्यापूर्वीच स्पर्धकाने घाईने रतन टाटा (Ratan Tata) हे उत्तर दिले. यावर आश्चर्य व्यक्त करित अमिताभ बच्चन म्हणतात, मला कमीत-कमी पर्याय तर सांगू द्या. स्पर्धक म्हणाला, सर गरज नाही. मला हेडलाईन वाचूनच बातमी कळते.

Amitabh Bachchan
आमिर-अक्षय समोरासमोर, एकाच दिवशी दोघांचे चित्रपट होणार प्रदर्शित

लिफाफा पाहूनच पत्रात काय लिहिले असेल हे समजते. यानंतर अमिताभ त्याला विचारतो, तुम्हाला इतकी घाई का? समोर बसलेला तरुण स्पर्धक म्हणाला, माझ्याजवळ करण्यासाठी खूप काही आहे. मात्र माझ्याजवळ कमी वेळ आहे. योलो, योलो सर योलो ! बच्चन तरुणाला विचारतात, की या संक्षिप्त शब्दाचा अर्थ काय आहे. त्यावर तो म्हणतो यू ओनली लिव्ह वन्स ! यावर हसून अमिताभ बच्चन म्हणतात, सर, YGJH चा अर्थ यह गलत जवाब है. योग्य पर्याय डी आहे. वरील पर्यायांपैकी कोणतेही नाही. त्यानंतर अमिताभ कॅमऱ्याकडे पाहून प्रेक्षकांना म्हणतात, ज्ञान कुठूनही मिळवा. मात्र त्याची खात्री करुन घ्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com