माधवनच्या 'राॅकेट्री' चित्रपटाला पाडण्याचे 'कट' कारस्थान?, पोस्टरच दिसेना | Rocketry The Nambi Effect | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

R Madhavan And Rocketry The Nambi Effect

माधवनच्या 'राॅकेट्री' चित्रपटाला पाडण्याचे 'कट' कारस्थान?, पोस्टरच दिसेना

केंद्रात सत्तेवर राहिलेल्या युपीए सरकारच्या काळात १९९४ मध्ये षडयंत्रात अडकलेल्या अंतराळ वैज्ञानिक नांबी नारायणनच्या बायोपिकची चहू बाजूंनी कौतुक होत आहे. चित्रपट पाहून येणारे मित्रांसह सोशल मीडियावर (Social Media) चित्रपटाचे कौतुक करित आहेत. मात्र बहुतेकांना कळेना की या चित्रपटाचे पोस्टर चित्रपटगृहांमध्ये का लावले गेले नाहीत. चित्रपटगृहांच्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे, की चित्रपटाचे पोस्टर त्यांच्या वितरकांनी पाठवले नाही आणि त्याची हिंदी आवृत्ती उत्तर भारतात वितरित करणारी कंपनी यूएफओ मूव्हीजचे अधिकाऱ्यांना याची माहितीच नाही. (Rocketry The Nambi Effect's Posters Not Seen At North Indian Theatres)

हेही वाचा: आमिर-अक्षय समोरासमोर, एकाच दिवशी दोघांचे चित्रपट होणार प्रदर्शित

दिल्लीच्या सिनेपोलिसचे हाॅल

अंतराळ वैज्ञानिक नांबी नारायणनच्या बायोपिक 'राॅकेट्री द नांबी इफेक्ट' (Rocketry The Nambi Effect) दिल्ली, यूपी वितरण क्षेत्राच्या केवळ २०० स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला आहे. दिल्लीच्या निर्माण विहारस्थित सिनेपोलिस चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यास पोहोचलेले प्रेक्षकांना चित्रपटाचे पोस्ट न दिसल्याने हैरान झाले आहे. याबाबत उपस्थित कर्मचाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले, जे चित्रपट येणार आहे, त्याचे पोस्टर लावले जातात. याचा अर्थ चित्रपटगृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही माहित नाही की त्यांच्या येथे 'राॅकेट्री द नांबी इफेक्ट' प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटगृहात आगामी चित्रपटांचे पोस्टर जेथे लावले जातात, तेथेही आठवड्याभरापूर्वी पर्यंत 'राॅकेट्री द नांबी इफेक्ट'चे पोस्टर लावले गेले नव्हते.

हेही वाचा: रहना है तरे दिल में: Remake मध्ये कार्तिक आणि आलिया? आर माधवन स्पष्टच बोलला

माधवन यांनाही आश्चर्य

दुसरीकडे चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक आर माधवनच्या ( R Madhavan) चित्रपटाची माहिती चित्रपटगृहांमध्ये पोहोचवली जात नाही. हिंदीत उत्तर भारतात सर्व चित्रपटगृहांमध्ये चित्रपट वितरक कंपनीने चित्रपटाचे पोस्टरही पोहोचवले नाही. ही माहिती मिळताच आर माधवन यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ते म्हणतात, याविषयी मला माहितीच नाही. मी याबाबत यूएफओ मूव्हीजशी बोलणार आहे.

Web Title: Rocketry The Nambi Effects Posters Not Seen At North Indian Theatres

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..