KBC 14: 'चाहत्यांपासून दूर रहा', स्पर्धकानं सल्ला देताच त्यावर अमिताभचं उत्तर एक नंबर...

'कौन बनेगा करोडपती' हा शो अमिताभ बच्चन आणि स्पर्धकांमध्ये रंगणाऱ्या संवादामुळे भलताच चर्चेत येत आहे.
KBC 14: If I fell ill because of my audience, i would consider myself to be lucky- Amitabh Bachchan
KBC 14: If I fell ill because of my audience, i would consider myself to be lucky- Amitabh BachchanGoogle

KBC 14: महानायक अमिताभ बच्चन यांना काही दिवसांपूर्वी दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली होती. 2021 मध्ये देखील त्यांना कोरोना झाला होता. त्यामुळे पुन्हा कोरोना झाल्यानंतर त्यांना थोडा जास्त त्रास सहन करावा लागला. कौन बनेगा करोडपती शो चं शूटिंग देखील त्या कारणानं बंद केलं होतं. लोकांच्या गर्दीला ते टाळताना देखील दिसले. पण यावर दस्तुरखुद्द अमिताभ यांचे म्हणणे आहे की,''चाहत्यांच्या गर्दीत सामिल झाल्यानं जर मी आजारी पडत असेल तर मला त्याचं दुःख नाही.(KBC 14: If I fell ill because of my audience, i would consider myself to be lucky- Amitabh Bachchan)

KBC 14: If I fell ill because of my audience, i would consider myself to be lucky- Amitabh Bachchan
पाकिस्ताननं चोरली अमिताभच्या 'कौन बनेगा करोडपती' ची संकल्पना; हुबेहूब तसाच शो,केला फक्त एकच बदल...

आता कौन बनेगा करोडपती १४ मध्ये एका स्पर्धकानं बिग बी यांच्यासमोर हॉट सीटवर बसल्यावर ती वैद्यकिय क्षेत्रात काम करते असे सांगितले. तेव्हा अमिताभनी मिश्किल अंदाजात त्या स्पर्धक महिलेला विचारलं की,''व्हायरस कोणाच्या शरीरात प्रवेश करायचा हे कसं ठरवतो?'' तेव्हा स्पर्धक जोरजोरात हसली आणि म्हणाली, ''व्हायरस साधारण असतो फक्त तुम्ही कुठूनही बाहेरुन आलात तर स्वतःला स्वच्छ करणं, सॅनिटाइज करणं गरजेचं आहे''.

KBC 14: If I fell ill because of my audience, i would consider myself to be lucky- Amitabh Bachchan
Sonam Kapoor: 'करवा चौथ व्रत करण्यापेक्षा...', सोनम कपूर स्पष्टच बोलली

पुढे शाम्भवी म्हणाली,'सर,मी हे तुम्हाला फक्त या कारणानं सांगत आहे,कारण तुम्ही इथे अनेक चाहत्यांना भेटता,जर यापैकी कोण आजारी असेल तर त्याची लागण तुम्हालाही होऊ शकते''. तेव्हा बिग बी म्हणाले,''मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, जर मी आजारी माझ्या प्रेक्षकांमुळे,चाहत्यांमुळे पडत असेन तर मी स्वतःला भाग्यशाली समजतो''.

KBC 14: If I fell ill because of my audience, i would consider myself to be lucky- Amitabh Bachchan
Low Budget Movie: फक्त ९५ हजारात बनला सिनेमा, निर्मात्यानं मानधन म्हणून टीमला पैसे नाही तर दिले...

पुढे अमिताभ शाम्भवीला उत्तर देत म्हणाले,'' माझ्या प्रेक्षकांमुळे,चाहत्यांमुळे मी आजारी पडतो याचं मला मुळीच दुःख नाही किंवा मी त्याची तमा बाळगत नाही. मला त्यांना भेटायची संधी मिळते हे मी माझं भाग्य समजतो. मी त्यांच्याशी हस्तांदोलन करताना जराही मनात संकोच बाळगत नाही. माझ्यासाठी माझे प्रेक्षक,माझे चाहते खूप महत्त्वाचे आहेत''.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com