KBC13: कोट्यधीश हिमानी यांनी सांगितला सेटवरचा अनुभव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

KBC13: कोट्यधीश हिमानी यांनी सांगितला सेटवरचा अनुभव

KBC13: कोट्यधीश हिमानी यांनी सांगितला सेटवरचा अनुभव

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो 'कौन बनेग करोडपती'मध्ये (Kaun Banega Crorepati) येणाऱ्या स्पर्धकांची अनेक स्वप्नं असतात. त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी ते शोमध्ये सहभागी होतात. या शोचे सूत्रसंचालन बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) करतात. या शोमध्ये येणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाचे मनोबल बिग बी वाढवतात. 'कौन बनेगा करोडपती सिझन 13' मध्ये पहिल्या करोडपती ठरणाऱ्या दिव्यांग शिक्षिका हिमानी बुंदेला या लवकरच 7 कोटी रूपये बक्षिस असणाऱ्या प्रश्नासाठी खेळणार आहेत. त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये या शोच्या सेटवर आलेला अनुभव सांगितला.

इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये हिमानी यांनी सांगितले, 'सेटवर जाण्यापूर्वी मला माहित नव्हते की, लोक माझ्याकडे कसे पाहतील. ते मला सहानुभूती दाखवतील की, इतर स्पर्धकांसारखी समान वागणूक देतील? असे प्रश्न मला पडत होते. सेटवरील प्रत्येकाने माझ्याकडे सन्मानाने पाहिले आणि मला समान वागणूक दिली, तेव्हा माझी सर्व भीती नाहीशी झाली.'

पुढे हिमानी म्हणाल्या, ' स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात मी खूप चिंतेत होते. तीन प्रश्नांमध्ये वेगवान असणे आवश्यक आहे. हे खूप आव्हानात्मक होते. पण त्यानंतर बच्चन सर स्टेजवर येताच आणि शूटिंग सुरू झाल्यावर मला खूप छान वाटले. मी हरले तरी इथून खूप शिकून घरी परत जाईन, असे मला वाटले.'

हेही वाचा: भन्साळींच्या चित्रपटातून सोनम कपूरची हकालपट्टी? जाणून घ्या सत्य

२०११ मध्ये हिमानी यांना अपघात झाला होता. त्या अपघातात त्यांना त्यांची दृष्टी गमावली होती. मात्र असे होऊनही हिमानी यांनी हार मानली नाही. त्या मोठ्या जिद्दीनं आपल्या आयुष्याला सामोऱ्या गेल्या. अथक कष्टातून त्यांनी आपलं आयुष्य घडवलं. इतरांना प्रेरणा देणारं आयुष्य त्या जगल्या आहेत. त्याविषयी त्या एपिसोडमध्ये दाखवले जाणार आहे. आपल्या आतापर्यतच्या प्रवासाबद्दल हिमानी सांगतात की, सगळेच तर आपआपल्या पद्धतीनं जगत असतात. मात्र त्या जगण्याला काही अर्थ असावा. असं मला वाटतं.