Kedar Shinde: पहिलाच व्हिडिओ इतका भारी मग चित्रपट तर.. 'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटाची झलक बघाच!

केदार शिंदे यांच्या 'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटाची पहिली झलक आली समोर..
Kedar Shinde shared video of maharashtra shahir movie behind the scene
Kedar Shinde shared video of maharashtra shahir movie behind the scene sakal

Kedar Shinde News: अवघ्या 95 दिवसांवर येऊन ठेपलेल्या केदार शिंदे दिग्दर्शित आणि शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटा बाबत प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर कधी येणार याकडे सगळे डोळे लावून बसलेले असतानाच केदार शिंदे यांनी या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा आणि काही दृश्यांचा एक व्हिडिओ शेयर केला आहे.(Kedar Shinde New movie Maharashtra Shaheer)

हा व्हिडिओ मध्ये 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटाची झलक दिसून आली आहे. या व्हिडिओ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून जर झलक अशी असेल तर तर चित्रपट किती दर्जेदार असेल याची चर्चा आता प्रेक्षकांमध्ये रंगली आहे.

(Kedar Shinde shared video of maharashtra shaheer movie behind the scene)

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

Kedar Shinde shared video of maharashtra shahir movie behind the scene
Balasaheb Thackeray Jayanti: त्यावेळी बाळासाहेबांनी एकाच दणक्यात केलं बॉलीवूड गार .. पुढे सगळेच होते दबकून!

दिग्दर्शक केदार शिंदे (kedar shinde) सध्या बरेच चर्चेत आहेत. कारण 'बाईपण देगा देवा' आणि 'महाराष्ट्र शाहीर' असे त्यांचे लोक दमदार चित्रपट लककरच प्रदर्शित होणार आहेत. त्यातही गेली काही दिवस केदार शिंदे 'महाराष्ट्र शाहीर'च्या निमित्ताने शाहीर साबळे यांच्या आठवणी शेयर करत आहेत. आज तर त्यांनी या चित्रपटातील चित्रीकरणाची एक झळक शेयर केली आहे.

या व्हिडिओमध्ये शाहीर साबळे यांच्या बालरूपातील झलक समोर आली आहे. शाहीर साबळे यांची जडणघडण कशी झाले, संगीतांचे संस्कार कसे झाले हे दाखवणारा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओतील गांव आपलं लक्ष वेधून घेतो. आणि सोबतच केदार शिंदे यांनी दिलेलं कॅप्शनही..

केदार शिंदे यांनी लिहिलं आहे की, 'कलेचं बाळकडू लहानग्या कृष्णाला घरातूनच मिळालं होतं..
वडील भजन गात असल्याने अगदी लहानपणापासून त्यांच्यावर झालेल्या संगीताच्या संस्कारातून त्यांच्यातला कलावंत घडत होता.. अर्थात, हा प्रवास संघर्षमयच होता..

''पण, प्रवासात आलेले खाचखळगे पार करून ठरवलेलं ध्येय गाठायचंच हा निर्धार मनाशी पक्का केल्यामुळे महाराष्ट्राला शाहिरांसारखा थोर लोककलावंत लाभला.. शाहीर साबळेंचं बालपण पडद्यावर साकारण्यासाठी दिग्दर्शकांसोबत बालकलाकारही अगदी जीव ओतून काम करत आहेत..''

'' शाहिरांवर बालपणी झालेले संस्कार, आणि त्यातून त्यांच्या व्यक्तीमत्वाच्या जडणघडणीचा पाया कसा रचला गेला हे सगळं २८ एप्रिलपासून ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातून अनुभवायला मिळणार आहे..'' असे त्यांनी म्हंटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com