
Ketaki Chitale : केतकीच्या हातावरील टॅटूचं 'पवार कनेक्शन'? तो आकडा म्हणजे...
Ketaki Chitale Marathi celebrity Tatto Video Viral Connection : केतकीविषयी जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. ती नेहमीच तिच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. केतकीनं गेल्या दोन ते तीन दिवसांत सातत्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेयर करताना दिसते आहे. त्यात तिची एक ती हातावरील टॅटूची पोस्ट मात्र भलतीच चर्चेत आली आहे.
केतकीनं यापूर्वी कोरेगाव भीमावर पोस्ट शेयर करत नेटकऱ्यांनी व्यक्त होण्यास भाग पाडलं आहे. त्यात तिनं मराठ्यांचा पराभव करण्यासाठी जे इंग्रजांच्या बाजूनं लढले त्यांच्याविषयी मी काय बोलू, असे सांगत एक पोस्ट शेयर केली होती. त्यावरुन तिला ट्रोल केले गेले. यावर काहींनी केतकीची बाजूही घेतली आहे. मात्र केतकी जे बोलते त्यावरुन वाद होतोच हेच पुन्हा दिसून आले आहे.
Also Read - ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

Ketaki Chitale Marathi celebrity Tatto Video Viral Connection
आता केतकीची त्या फोटोंवरुन चर्चा होते आहे. केतकीनं तो फोटो शेयर केला होता. केतकीनं आपल्या हातावर काही अंक टॅटू करुन घेतले आहेत. त्याचा अर्थ काय असा प्रश्न तिला नेटकऱ्यांनी विचारला होता. यावर तिनं दिलेलं उत्तर आणि तिनं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेली टीका याचा संबंध नेटकऱ्यांनी जोडला आहे. त्यावरुन तिला काही सवालही विचारले आहे. तुझ्या टॅटूचा अर्थ काय असं विचारताच तिनं दिलेलं उत्तर लक्ष वेधून घेताना दिसते.
हेही वाचा: Ketaki Chitale: "हिंदू आहेस ना", नेटकऱ्याने झापलं तर केतकीनं डायरेक्ट शिवीचं ...
मागील वर्षी केतकीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. यामुळे तिला तुरुंगात जावं लागलं होतं. केतकीचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये तिनं हातावर ‘186/22’ असे गोंदवून घेतले आहे. त्याचा अर्थ काय असा प्रश्न एका नेटकऱ्यानं केतकीला विचारला होता.
हेही वाचा: Ketaki Chitale: कोरेगाव भीमावर केतकी म्हणाली, "मराठा सैन्याविरुद्ध लढणाऱ्या लोकांना..."
केतकीनं उत्तर देताना म्हटलं होतं की, “हा टॅटू म्हणजे माझा अंडरट्रायल कैदी नंबर आहे. ते अंक कैदी नंबरचे आहेत. मी कोणालाही माफ करु शकते. पण विसरु शकत नाही”, असे तिने त्या नेटकऱ्याला उत्तर देताना म्हटले आहे. पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याने केतकी ४१ दिवस तुरुंगात होती. तिच्यावर अनेक कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.