Ketaki Chitale: शुभेच्छा देताना झाली चूक अन् केतकी चितळेनं पुणेकरांची लाज काढली.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ketaki Chitale shared video on gudhi padwa wishes banner in pune

Ketaki Chitale: शुभेच्छा देताना झाली चूक अन् केतकी चितळेनं पुणेकरांची लाज काढली..

Ketaki Chitale Viral Video : अभिनेत्री केतकी चितळे अभिनयापेक्षा कायम आक्षेपार्ह पोस्टमुळे सतत चर्चेत असते. तरीही तिचा सोशल मीडियावरचा वावर सगळ्यांच लक्ष वेधून घेतो. पण सध्या तिची पोस्ट वेगळ्याच कारणासाठी व्हायरल होत आहे.

कारण तिने पुण्यात जाऊन थेट पुणेकरांचीच फिरकी घेतली आहे. आज गुढीपाडव्या निमित्त पुण्यात सर्वत्र शुभेच्छांचे बॅनर लागलेत. पण या वेळी बॅनर वर एक चूक झालेली दिसली. त्यावरून केतकी चांगलीच बरसली आहे.

(Ketaki Chitale shared video on gudhi padwa wishes banner in pune)

आज हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा.. आजच्या दिवशी चैतन्याची गुढी उभारून नववर्षाचं स्वागत केलं जातं. अनेक ठिकाणी राजकीय पक्ष आणि विविध संस्था मोठ्या उत्साहात शोभा यात्रा काढतात. पारंपरिक पोशाख करून रस्त्यावर उतरतात.

आपल्याकडे पुण्यातही मोठ्या थाटात गुढीपाडवा साजरी केला जातो. अशा पुण्यात सध्या गुढी पाडव्याच्या शुभेच्छांची जोरदार बॅनरबाजी केली गेलीय. पण यावेळी हिंदू नववर्षाच्या पुणेकरांनी इंग्रजीतून शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे पुण्यातील लोकांना स्वघोषित मावळे म्हणत अभिनेत्री केतकी चितळेनं त्यांना चांगलेच धारवेर धरले आहे.

केतकी एक व्हिडिओ करत म्हणाली आहे, 'नमस्कार मी केतकी चितळे, आता मी आहे पुण्यात.. म्हणजेच स्वघोषित मावळ्यांच्या जन्मभूमीत.. रस्त्यावर चालताना मला बऱ्याच ठिकाणी 'हॅप्पी गुढी पाडवा' असे पोस्टर दिसले. त्यामुळे मला या सगळ्या मावळ्यांना विचारायचं आहे की, आता तुम्ही विसरलात का महाराजांना, त्यांच्या शिकवणीला.. '

पुढे ती म्हणते, 'की फक्त दादागिरी करताना महाराजांचे नाव वापरुन त्यांचा अपमान करता.. आजही नवीन वर्षांच्या हॅप्पी गुढी पाडवा अशा शुभेच्छा देताना तुम्हाला काहीच वाटत नाही का.. असो.. गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..' तिचा हा व्हिडिओ सध्या बराच व्हायरल होत आहे.