Kiran Mane News: आरं कुठला आलाय व्यायाम आन् कुठली आलीय जीम.. शेतातून किरण माने यांनी दिला एक सल्ला.. | kiran mane shared post about gym exercise and urban farming | Entertainment News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kiran mane shared post about gym exercise and urban farming

Kiran Mane News: आरं कुठला आलाय व्यायाम आन् कुठली आलीय जीम.. शेतातून किरण माने यांनी दिला एक सल्ला..

Kiran Mane News: शहरातल्या धकाधकीच्या जीवनातून निवांत वेळ काढून गावी जावं, आनंदानं राहावं असं अनेकांना वाटत असतं. शेतातल्या ताज्या भाज्या, गावरान चवीचं जेवण याची मजा काही वेगळी असते, त्यात शेतात राबणं म्हणजे लय कष्टाचं काम.. याच विषयी आज अभिनेते किरण माने यांनी पोस्ट लिहिली आहे.

किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सातत्याने ते काहीना काही पोस्ट करत असतात. आज त्यांनी एक पोस्ट करत शेतीचं महत्व आपल्याला पटवून दिलं आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. (Entertainment News in Marathi)

(kiran mane shared post about gym exercise and urban farming)

या पोस्ट मध्ये किरण माने म्हणतात, ''आरं कुठला आलाय व्यायाम आन् कुठली आलीय जीम...
तशी आमची लै येगळी गावरानी 'थीम' !


'ताटामधी रोज असतो ताजा भाजीपाला,
चार मुठी घिवुन जातो, कुनीबी आला-गेला...
हृदयाच्या कप्प्यात असतं मानुसकीचं 'सिम'
तशी आमची लै येगळी गावरानी थिम !"

...कधीबी रानात गेलो की माझ्या नाटकासाठी माझा जिगरी दोस्त थळ्या लोखंडेनं ल्हीलेली ही कविता आठवती. खरंच शेतातला ताजा,टवटवीत,हिरवागार भाजीपाला खुडून रातीच्या जेवनात खान्यात जे सुख हाय, ते शब्दांत नाय सांगता येनार !'(Marathi Tajya Batmya)

पुढे ते म्हणतात, 'शहरात रहानार्‍या आनि शेतीशी फारसा संबंध नसलेल्या माझ्या भावाबहिनींनाबी हा आनंद घेता येनं सहज शक्य हाय... कसं? आवो, 'सस्टेनेवल अर्बन फार्मिंग' करून... जरा इस्कटून सांगतो...'

'शहरातल्या प्रत्येकानं आपल्या टेरेसवर, गॅलरीत, कुठल्याबी मोकळ्या जागेत मधी आपल्यापुरतं, छोटं का होईना 'फार्मिंग' करून बघा... फायद्यासाठी नाय बरं का.. 'जाणीव' म्हनून ! एकतरी भाजी आपली आपन पिकवायची आन् खायाची. ज्या दिवशी हे कराल ना, त्यादिवशी पयला घास पोटात गेल्यागेल्या 'जगात भारी' सुखाचा अनुभव घ्याल गड्याहो...' करून तर बघा ! अशी पोस्ट त्यांनी शेयर केली आहे.

गेली काही दिवस किरण माने बरेच चर्चेत आहेत, सुरवातीला वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे किरण माने सध्या बिग बॉस मुळे चर्चेत आहे. मुंबईत सह ग्रामीण भागात त्यांची प्रचंड हवा आहे.

टॅग्स :marathi actor