
'केजीएफ चॅप्टर 2' मधील 'या' अभिनेत्याचं निधन
केजीएफ चॅप्टर २(KGF Chapter 2) फेम अभिनेता मोहन जुनेजाचं(Mohan Juneja) ७ मे,२०२२ रोजी सकाळी निधन झालं. अभिनेता खूप दिवसांपासून आजारी होता,त्याच्या वर उपचार सुरु असतानाच त्याची प्राणज्योत मालवली आहे. बंगळुरु मधील एका खाजगी रुग्णालयात अभिनेत्यानं अखेरचा श्वास घेतला आहे. मोहन जुनेजाची दाक्षिणात्य सिनेमांत विनोदी अभिनेता म्हणून ओळख होती. त्यानं आपल्या विनोदाच्या अचूक टायमिंगनं प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. मोहन जुनेजाच्या अचानक जाण्यानं साऊथ इंडस्ट्रीतील अनेकांना धक्का बसला आहे. आज मोहन जुनेजावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
हेही वाचा: Video: सोनमला लागले गोड खाण्याचे डोहाळे; हॉटेलमध्ये जाऊन स्वतः बनवलं डेझर्ट
मोहन जुनेजानं विनोदी अभिनेता म्हणून आपलं करिअर सुरू केलं होतं. 'केजीएफ २' सिनेमात पत्रकार आनंद के इनफॉर्मर ही भूमिका त्यानं साकारली होती. मोहननं तामिळ,तेलगू,मल्याळम,हिंदी भाषिक सिनेमातून काम केलं आहे. आतापर्यंत मोहनने १००हून अधिक सिनेमांत काम केलं होतं. 'केजीएफ चॅप्टर १' आणि 'केजीएफ चॅप्टर २' मध्ये देखील मोहननं काम केलं आहे. अभिनेत्याला 'चेतला' सिनेमातून मोठा ब्रेक मिळाला होता. या सिनेमात त्यानं साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली होती.
मोहन जुनेजा यांच्या निधनानंतर दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील त्यांचे सहकलाकार आणि चाहते सोशल मीडियावर दुःख व्यक्त करीत आहेत. मोहन जुनेजा यांना लहानपणापासूनच अभिनेता बनायचं होतं. आपल्या कॉलेजच्या दिवसांतही ते नाटकातून कामं करायचे. २००८ मध्ये आलेला रोमॅंटिक कॉमेडी सिनेमा 'संगमा' मधनं त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली. रवि वर्मा गुब्बी यांनी या सिनेमाला दिग्दर्शित केलं होतं. त्यानंतर कन्नड तामिळ सिनेमा 'टॅक्सी नंबर' मध्ये ही काम केलं होतं. २०१० मध्ये कन्नड भाषिक नाटक 'नारद विजया' मध्ये मोहनच्या अभिनयानं सगळ्यांना थक्क करुन सोडलं होतं. मोहन जुनेजा हे कन्नड अभिनेते म्हणून ओळखले जायचे. २०१८ मध्ये हॉरर सिनेमा 'निगूडा' मध्ये त्याची भूमिका होती. हा कन्नड भाषिक सिनेमाच होता. सर्व जॉनरचे सिनेमे केल्यानंतरही मोहन जुनेजा मात्र विनोदी अभिनेते म्हणून ओळखले जायचे.
Web Title: Kgf 2 Actor Mohan Juneja Dies At 54 After Suffering From Prolonged
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..