Video: सोनमला लागले गोड खाण्याचे डोहाळे; हॉटेलमध्ये जाऊन स्वतः बनवलं डेझर्ट Sonam Kapoor | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sonam Lapoor

Video: सोनमला लागले गोड खाण्याचे डोहाळे; हॉटेलमध्ये जाऊन स्वतः बनवलं डेझर्ट

बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर(Sonam Kapoor) सध्या आपल्या गरोदरपणाचे(Pregnant) दिवस मस्त एन्जॉय करताना दिसत आहे. याच वर्षी मार्च महिन्यात सोनमनं आपण आई होणार असल्याचं सोशल मीडियावरनं जाहिर केलं. सोशल मीडियावर सोनम नेहमी सक्रिय पहायला मिळते. आता तर ती मस्त मस्त बेबी बंप फ्लॉन्ट करत फोटो शेअर करताना दिसते. सध्या तिचा एक धमाल व्हिडीओ जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. जो व्हिडीओ पाहून वाटतंय की बहुधा तिला गरोदरपणात गोड खाण्याचे डोहाळे लागले आहेत. ती एका हॉटेलमध्ये गेली आहे आणि स्वतः एक गोड पदार्थ बनवायला शिकत आहे. ज्याला इंग्रजी भाषेत आपण 'डेझर्ट' म्हणतो. लंडनमधील एका हॉटेलच्या किचनमध्ये ती शेफकडून ते डेझर्ट बनवायला शिकत आहे. नेहमी प्रेग्नेंसीमध्ये देखील स्वतःच्या फिटनेसची काळजी घेताना दिसणाऱ्या सोनमला आता मात्र गोडाचे डोहाळे लागल्यानं खाण्याचा मोह आवरत नाही असं दिसत आहे. बरं यामुळे ती दुसरा आपल्याला खायला देईल याची वाट न पाहता स्वतः ते बनवून खाताना दिसत आहे.

हेही वाचा: अमिताभ यांच्या 'जलसा' बंगल्यातील प्रत्येक कोपरा बोलका; पहा Inside Photos

सोनम कपूरने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे,जो लंडनमधील एका हॉटेलमधला आहे. जिथे ती किचनमध्ये शेफसोबत तिचं फेव्हरेट डेझर्ट बनवताना दिसत आहे. ज्या डेझर्टचं नाव आहे,गोल्डन हेजलनट. तिनं व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे,''माझ्या प्रेग्नेंसी दरम्यान माझ्या मित्रानं मला एक छान सरप्राईज दिलं आहे. त्याच्या हॉटेलमध्ये येऊन मी चक्क माझ्या आवडीचं डेझर्ट बनवण्याचा आनंद घेतेय''. साधारण अशा संदर्भाची ती पोस्ट आहे. आणि प्रत्यक्षात सोनम कपूर तिचे डोहाळे कसे पुरवतेय हे सांगणारा व्हिडीओ बातमीत जोडला आहे.

याआधी काही दिवसांपूर्वी सोनमनं काळ्या रंगाच्या ट्रान्स्परंट कफ्तान ड्रेसमध्ये एक फोटोशूट केलं होतं,जे खूप व्हायरलही झालं होतं. या फोटोत तिचं बेबी बंप स्पष्ट दिसत होतं. आणि अर्थातच तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसीचा ग्लो देखील दिसत होता.

Sonam Kapoor

Sonam Kapoor

सोनम कपूरनं २१ मार्च रोजी सोशल मीडियावर बेबी बंप फ्लॉन्ट करत आपले काही फोटो देखील शेअर केले होते. ज्यात तिचा पती आनंद अहूजा देखील दिसत होता. या पोस्टच्या माध्यमातून सोनमनं तिच्या चाहत्यांना प्रेग्नेंसीची बातमी दिली होती.

सोनमच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर ती स्क्रीनवर शेवटची Ak vs AK या सिनेमात कॅमिओ रोलमध्ये दिसली होती. या सिनेमाला विक्रमादित्या मोटवानीनं दिग्दर्शित केलं होतं. सोनम आता क्राइम थ्रिलर ब्लाइंडमध्ये दिसणार आहे. याला शोम मखिजानं दिग्दर्शित केलं आहे. याच नावानं बनलेल्या कोरियनं सिनेमाचा हा रीमेक आहे.

Web Title: Sonam Kapoor Making Dessert In Hotel Kitchenvideo

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top