स्ट्रगल काळात चक्क 5 दिवस आंघोळीविना राहिला होता KGF चा रॉकी भाई.. कारण ऐकाल तर चक्रावेल डोकं..KGF 2 Actor yash | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

KGF star yash reveals folks from his home town spreading weired stories after his success.once he did not bath for 5 days

Tollywood: स्ट्रगल काळात चक्क 5 दिवस आंघोळीविना राहिला होता KGF चा रॉकी भाई.. कारण ऐकाल तर चक्रावेल डोकं..

Tollywood: केजीएफ चा रॉकी उर्फ यशला २०२२ मधील भारतातला सर्वात मोठा रॉकिंग स्टार म्हटलं तर नक्कीच चूकीचं ठरणार नाही. त्याच्या केजीएफ २ ने यावर्षात बॉक्सऑफिसवर तगडी कमाई करत अनेक रेकॉर्ड केले आहेत. तब्बल ८५० करोडची कमाई या सिनेमानं केली आहे. २०१८ मध्ये रिलीज झालेल्या केजीएफच्या पहिल्या भागानंतर यशला भारतात मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. त्याचं फॅन फॉलोइंग भारतातं जबरदस्त वाढत गेलं,त्यामुळे केजीएफ २ ला भरपूर यश मिळणार हे तर निश्चित होतं. आणि तसंच झालं..'केजीएफ २' हिट झाला.(KGF star yash reveals folks from his home town spreading weired stories after his success.once he did not bath for 5 days)

हेही वाचा: Asha Parekh: दीपिकाच्या भगव्या बिकिनी वादावर स्पष्टच बोलल्या आशा पारेख; म्हणाल्या,'आजकाल..'

दुसऱ्या सिनेमानंतर फक्त सर्वसामान्य जनताच नाही तर भारतातील सर्वात बड्या स्टार्सनीही यशला सर्वात तगडा स्पर्धक मानायला सुरुवात केली आहे. यशाच्या शिखरावर बसलेला यश खरंतर कर्नाटकच्या एका छोट्याशा गावातील अगदी साध्या कुटुंबातील मुलगा आहे. त्याचे वडील साधे ड्रायव्हर होते. यशनं आपल्या मेहनतीच्या बळावर बंगळुरू गाठलं आणि थिएटरमध्ये स्ट्रगल करायला सुरुवात केली होती. अशा अगदी साध्या कुटुंबातून आलेल्या यशचा इंडस्ट्रीतला खडतर प्रवास खूप चांगली शिकवण देणारा आहे.

हेही वाचा: Atal Bihari Vajpayee Biopic: 'मनात थोडीशी भीती..पण मै अटल हूं..', पंकज त्रिपाठीच्या पोस्टनं वेधलं लक्ष

जेव्हा कोणी यशस्वी होतं तेव्हा त्याला आधीपासून ओळखणारे लोकं खूप वेगळ्या पद्धतीनं रिअॅक्ट होतात. यशनं नुकतंच एका मुलाखती दरम्यान सांगितलं होतं की त्याच्या शहरात त्याला आधीपासून ओळखणारे लोक त्याला यश मिळाल्यानंतर त्याच्यात आपला वाटा देखील शोधू लागले,त्यासाठी नवनवीन कहाण्या बनवू लागले.

हेही वाचा: Bollywood: 'नीना गुप्तांमुळे बॉलीवूडमधील इतर अभिनेत्रींना...', 'ऊंचाई' फेम सारिका यांनी ओपन केलं सीक्रेट

यश त्याच मुलाखतीत पुढे म्हणाला की,''सगळ्यात जास्त तेव्हा वाईट वाटतं जेव्हा लोक मला म्हणतात,तू आता बदललायस. खरंतर वेळेनुसार,परिस्थितीनुसार बदलावं लागतं. पण हा बदल चांगल्यासाठी असावा हे मला चांगलं समजतं. तुम्ही आयुष्यात कितीही मोठे व्हा पण एक मात्र आहे तुम्ही ज्या ठिकाणचे आहात तिथे तुम्हाला कधीच सम्मान मिळत नाही. ते लोक विचार करतात की हा तर इथेच फिरायचा. कॉलेजमधले म्हणतात,अरे हा तर माझा क्लासमेट आहे. नाटक केले असेल कधी तुम्ही तर तिथले थिएटरचे लोक म्हणतात अरे मीच याला थिएटरमध्ये आणलं होतं''.

हेही वाचा: Urfi Javed: हॉकीपट्टू युवराज वाल्मिकीला भिडली उर्फी, मागचा-पुढचा विचार न करता अभिनेत्रीनं थेट..

यश पुढे म्हणाला,''आजकाल तर मला अशा गोष्टी ऐकायला मिळत आहेत,ज्या ऐकल्यावर मी विचार करतो की हे मी कधी केलं होतं..लोक म्हणतात कधी कधी मला पाहिल्यावर,अरे याने कितीतरी दिवस उपाशी राहून दिवस काढलेयत..मीच याला जेवायला दिलं होतं. एकदा तर कोणीतरी माझ्या विषयी म्हटलं होतं की मी पाच दिवस आंघोळ नव्हती केली. पण मला ते सहनच झालं नाही. कोणीतरी एक क्लीप मला पाठवली होती. मग मी त्या व्यक्तीला कॉल करुन विचारलं, मित्रा, मी कधी पाच दिवस आंघोळ नव्हती केली? हे काय आहे? तुला माझ्या यशाचं क्रेडिट घ्यायचं आहे तर घे, काही हरकत नाही. पण हे सगळं चुकीचं पसरवू नकोस''.