Happy Birthday Yash: खिशात 300 रुपये घेऊन बेंगळुरूला पोहोचलेला रॉकी भाई आज घेतो एका चित्रपटासाठी इतकी फी

यश त्याचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. रॉकी भाई या नावाने देशभर प्रसिद्ध असलेल्या यशचे खरे नाव नवीन कुमार गौडा आहे. कन्नड चित्रपट उद्योगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक.
Yash
YashSakal
Updated on

कन्नड फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार यश, जो त्याच्या KGF चित्रपटापासून भारतीय चित्रपटसृष्टीतील एक सुपरस्टार आहे. आज यश त्याचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. रॉकी भाई या नावाने देशभर प्रसिद्ध असलेल्या यशचे खरे नाव नवीन कुमार गौडा आहे. कन्नड चित्रपट उद्योगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक. KGF Chapter 2 साठी त्याला 30 कोटी रुपयांचा चेक मिळाला. कर्नाटकातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला, सुपरस्टार यश आज ब्रँड एंडोर्समेंटसाठी सुमारे 60 लाख रुपये आकारतो आणि त्याची एकूण संपत्ती 7 दशलक्ष डॉलर (सुमारे 57 कोटी रुपये) च्या जवळपास आहे.

यश म्हणजेच KGF चा रॉकी भाई कर्नाटकातील एका छोट्या गावात वाढला. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर त्याचे वडील कर्नाटकच्या सरकारी बस सेवेत ड्रायव्हर म्हणून काम करायचे. मुलगा यशस्वी अभिनेता झाल्यानंतरही तो अनेक वर्षे ड्रायव्हर राहिला. त्याचबरोबर यशला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. 12वीत असतानाच त्याने ठरवले होते की भविष्यात मला चित्रपटात हिरो बनायचे आणि या स्वप्नासाठी यश ने शिक्षण अर्धवट सोडले. यशच्या कुटुंबीयांना त्याने अभिनेता व्हावे असे वाटत नव्हते.

यश आपलं घर सोडून बेंगळुरूला पोहोचला. केवळ 300 रुपये घेऊन अभिनेता होण्यासाठी तो आपल्या कुटुंबापासून दूर आला. बेंगळुरूच्या थिएटर ग्रुपचा भाग होण्यासाठी सुरुवातीला खूप संघर्ष करावा लागला. अनेक दिवसांच्या धावपळीनंतर थिएटरमध्ये बॅकग्राउंड अभिनेत्याची जागा मिळाली. यानंतर यश हळू हळू पुढे गेला. चित्रपटांमध्ये तो सहाय्यक दिग्दर्शकही होता. यादरम्यान तो चित्रपट आणि टीव्ही मालिकांसाठी ऑडिशन देत राहिला. अनेक टीव्ही मालिका केल्यानंतर यशचा पहिला चित्रपट 2008 मध्ये प्रदर्शित झाला होता. मोग्गीना मनसु नावाच्या या चित्रपटात त्याने सहाय्यक भूमिका केली होती, ज्यासाठी त्याला पुरस्कारही मिळाला होता.

Yash
Alia-Ranbir: आलिया भट्ट-रणबीर कपूरने घेतला 'राहा' साठी महत्वाचा निर्णय; आता करणार...

KGF स्टार यश आणि राधिका पंडित यांची लव्हस्टोरी फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. दोघे 2004 मध्ये नंदागोकुला या टीव्ही शोच्या सेटवर एकमेकांना भेटले होते. हळुहळू दोघांमध्ये गोष्टी सुरू झाल्या आणि नंतर त्यांची मैत्री झाली. मैत्री वाढत गेली आणि यशने राधिकाला कॉल करून व्हॅलेंटाईन डेला प्रपोज केले. राधिकाने 6 महिन्यांनी या प्रस्तावाला उत्तर दिले. अखेर यश आणि राधिकाने 9 डिसेंबर 2016 रोजी बंगळुरूमध्ये लग्न केले. आज राधिका आणि यश यांना दोन मुले आहेत. मुलाचे नाव यथार्थ आणि मुलीचे नाव आयरा.

2008 सालापासून कन्नड सिनेमात सक्रिय असलेल्या यशला देशभरात ओळख मिळायला लागली. 2018 मध्ये रिलीज झालेल्या KGF-1 चे देशभरात कौतुक झाले. या कन्नड सिनेमाने जगभरात 250 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला. KGF-1 च्या यशानंतर KGF-2 2022 मध्ये आला. या चित्रपटानंतर यशची क्रेझ इतकी वाढली की सर्वजण त्याला 'सलाम रॉकी भाई' म्हणू लागले. रिपोर्ट्सनुसार, 100 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या KGF-2 ने जगभरात 1000 कोटींहून अधिक कलेक्शन केले.

Yash
Karuna Munde: उर्फी प्रकरणात धनंजय मुंडेंच्या पत्नीची उडी, 'त्या' महिला नेत्या बिनडोक

KGF 1 च्या यशानंतर यशने 2021 मध्ये नवीन डुप्लेक्स खरेदी केले. हे घर बेंगळुरूच्या विंडसर मनोरजवळ प्रेस्टिज अपार्टमेंटमध्ये आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर या डुप्लेक्सची सध्याची किंमत सुमारे 8 ते 8.5 कोटी रुपये आहे. येथे यश त्याची पत्नी राधिका पंडित आणि दोन मुलांसह राहतो.

यशच्या कार कलेक्शनमध्ये रेंज रोव्हर इव्होकचा समावेश आहे, ज्याची किंमत सध्या 60 ते 80 लाख रुपये आहे. या एसयूव्हीचा यूएसपी हा त्याचा एंड-टू-एंड सनरूफ आहे. याशिवाय रॉकिंग स्टारकडे दोन मर्सिडीजही आहेत. पहिली मर्सिडीज ही 5-सीटर GLC 250D कूप आहे ज्याची किंमत सुमारे 78 लाख रुपये आहे. आणि दुसरी मर्सिडीज कार 7-सीटर Benz GLS 350D लक्झरी SUV आहे, ज्याची किंमत सुमारे 85 लाख रुपये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com