'खाली- पिली'चा इशान आणि अनन्याचा पाहा पहिला लूक !

वृत्तसेवा
Wednesday, 28 August 2019

या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री अनन्या पांडे आणि इशानची जोडी पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र काम करणार आहेत. अनन्या पांडेचा हा तिसरा चित्रपट असून याआधी तिने 'स्टुडंट ऑफ द ईयर 2' मधून बॉलिवूडमध्य़े पदार्पण केलं. एवढच नाही तर सध्य़ा ती 'पती पत्नी और वो रिमेक' या आगामी सिनेमाचं शूटिंग करत आहे. 

मुंबई : धडकमधून सिनेमात पदार्पण केलेल्या इशान खट्टरचा आता दुसरा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खाली-पिली असं या चित्रपटाचं नाव असून नुकताच त्याचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. 

या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री अनन्या पांडे आणि इशानची जोडी पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र काम करणार आहेत. अनन्या पांडेचा हा तिसरा चित्रपट असून याआधी तिने 'स्टुडंट ऑफ द ईयर 2' मधून बॉलिवूडमध्य़े पदार्पण केलं. एवढच नाही तर सध्य़ा ती 'पती पत्नी और वो रिमेक' या आगामी सिनेमाचं शूटिंग करत आहे. 

'खाली-पिली'चं दिर्गदर्शन मकबूल खान हे करत असून या चित्रपट प्रेमकथेवर आधारीत आहे. पुढच्या वर्षी म्हणजेच 12 जून 2020 ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचं शूटिंग 11 सप्टेंबर पासुन सुरु होणार आहे. इशानने इन्स्टाग्रामवर याचा पहिला लुक अपलोड केला आहे आणि त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ''एक देढ़ शाणा, एक आयटम, एक टैक्सी, और एक रात की कहानी. अपुन ला रहे हैं 2020 की सबसे रापचिक पिक्चर."

'खाली-पिली'चा सेट मुंबईत उभारण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये रात्री भेटलेल्या एक मुलगा आणि मुलगीच्या जीवनात येणाऱ्या चढ-उतारांची कथा दाखवण्यात येणार आहे. दिर्गदर्शक मकबूल खान यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, "मी या तरुण टॅलेंटसोबत काम करण्यास उत्सुक आहे." चित्रपटाच्या पहिल्या लुकमध्ये अनन्या आणि इशान यांची केमिस्ट्री आर्कषित करत आहे. 

शाहिद कपूरचा भाऊ इशान सध्या दिर्गदर्शक मीरा नायर यांच्या टिव्ही सिरीजच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिरीजचं नाव 'अ सूटेबल बॉय' असून इशान यामध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. 'धडक' आणि 'बियॉन्ड् दि क्लाउड्स' या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत इशानने काम केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Khali pili s first look is out