'खतरो की खिलाडी'मधील स्पर्धकांची यंदा अग्निपरीक्षा, हिंसक प्राण्याशी... | Khatron Ke Khiladi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Khatron Ke Khiladi 12 Contestants

'खतरो की खिलाडी'मधील स्पर्धकांची यंदा अग्निपरीक्षा, हिंसक प्राण्याशी...

'खतरों के खिलाडी १२' शो मध्ये यंदा धोक्यांची पातळीत अधिक वाढ करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या एपिसोडपासून स्पर्धकांना अवघड स्टंट्सशी सामना करावा लागत आहे. मात्र कार्यक्रमाच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये भयानक स्टंट होणार आहे. जी पाहून तुम्ही थक्क व्हाल. (Khatron Ke Khiladi 12 Promo Out, Hyenas Attack On Kanika Mann)

हेही वाचा: काली पूर्वीही 'या' चित्रपटांमध्ये हिंदू देवी-देवतांवरुन वाद, बंदीची होती मागणी

तरसशी कनिकाचा सामना आणि मग..

आगामी एपिसोडचा एक प्रोमो व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओत एक स्टंटमध्ये कनिका मानचा सामना भयंकर अशा तरसशी होतो. रोहित शेट्टी (Rohit Shetty) प्रोमोत म्हणतो तुम्हाला दिसतो का हा तरस. जेव्हा हे सर्व झुंडीने येतात तेव्हा सिंहही पळून जातो. रोहित शेट्टी कनिका मानला म्हणतो पिंजऱ्यात तरस तुझ्याबरोबर राहतील. हे ऐकून सर्वजणांना धक्का बसतो. हिंसक तरसला पाहून कनिका मान ओरडून रडायला लागते. कनिकाचे ओरडणे ऐकून कोणालाही धक्का बसेल.

हेही वाचा: जितके निर्लज्ज बनाल, तितके पुढे जाल; चित्रपट निर्मात्याची भाजपवर टीका

स्पर्धक काय करणार ?

प्रोमोत पुढे डाॅक्टर कनिका मानवर उपचार करताना दिसत आहेत. तिची अवस्था पाहून अनेक स्पर्धकांना रडू कोसळते. जन्नत जुबेर, राजीव अदातिया आणि रुबीना दिलैकही रडू लागतात. तुषार कालिया प्रोमोत म्हणतात, पूर्ण पायच खाल्ला. मग प्रश्न पडतो की खरचं तरसने कनिकाचा पायच खाल्ला का? हे किती खरं किंवा खोटे हे एपिसोड पूर्ण पाहिल्यावरच कळू शकेल. प्रोमो व्हिडिओ समोर येताच अनेक युजर्स कनिका मानची काळजी व्यक्त करित आहेत. ती ठिक असेल अशी आशा व्यक्त करित आहेत. 'खतरो के खिलाडी १२' चा (Khatron Ke Khiladi) हा प्रोमो व्हिडिओ प्रत्येकाच्या हृदयाचे ठोक वाढवत आहे. व्हिडिओत स्पर्धकांचा चेहऱ्यावरील भिती पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की यावेळेस कार्यक्रमात धोक्याची पातळी किती भयाण राहणार आहे.

Web Title: Khatron Ke Khiladi 12 Promo Out Hyenas Attack On Kanika Mann

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..