Khatron Ke Khiladi 12 : चॅनलला विचारणार नाही, थेट...; रोहित शेट्टी भडकला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Shetty

Khatron Ke Khiladi 12 : चॅनलला विचारणार नाही, थेट...; रोहित शेट्टी भडकला

Khatron Ke Khiladi 12 : 'खतरो के खिलाडी १२' मध्ये या आठवड्यात जोड्यांमध्ये स्टंट होत आहे. हा आठवडा अत्याचार वीक आहे, ज्यात स्पर्धकांना जीवघेणे स्टंट करावे लागत आहे. त्यामुळे त्यांची तब्येत बिघडत आहे. प्रत्येक आठवड्याबरोबर अडथळेही वाढत चालले आहेत. शनिवारी प्रसारित एपिसोडमध्ये एका टास्कमध्ये शिवांगी जोशीची (Shivangi Joshi) तब्येत बिघडली आणि तिला वैद्यकीय मदत घ्यावी लागली. दुसऱ्या एका स्टंटमध्ये रानडुकरांमध्ये स्पर्धकाला परफाॅर्म करावे लागले होते. एका रानडुकराने निशांत भटचा चावा घेतला. रविवारी पाण्याच्या आत टास्क करावे लागणार आहे. (Khatron Ke khiladi 12 Rohit Shetty Reaction On Prateek Sahajpal)

हेही वाचा: रुसो ब्रदर्ससाठी पार्टी; मलायका, शाहीद कपूरसह बाॅलीवूड कलाकारांची हजेरी

रविवारच्या एपिसोडचा प्रोमो

प्रसारित केलेल्या प्रोमोत रोहित शेट्टी (Rohit Shetty) प्रतीक सहजपालवर भडकलेला दिसत आहे. सर्व स्पर्धक स्विमिंग पूलाजवळ उभे असतात. रोहित शेट्टी सांगतो की पुढील स्टंट पाण्याचा आहे. इतके ऐकताच प्रतीक म्हणतो, सर पोहोणे येत नाही. काय करु? प्रतीकचा प्रश्न ऐकताच रोहित आपली नाराजी व्यक्त करतो. रोहित म्हणतो, तर मग तुम्ही स्टंट शोमध्ये आले नाही पाहिजे. (Entertainment News)

हेही वाचा: आयकर विभागाकडून अक्षय कुमारचा सन्मान, सर्वाधिक कर भरणारा अभिनेता ठरला

प्रतीकवर नाराजी

प्रतीकला रोहित म्हणतो, तुम्ही डान्स शोमध्ये जाऊन मला डान्स येत नाही, असे म्हणू शकत नाही. तुम्ही स्टंट शोमध्ये येऊन मला पोहोणे येत नाही, असे म्हणू शकत नाही. हे मूर्खपणाचे वाटते. स्पष्टच म्हणतो तुम्ही हा शो पुन्हा साईन करु नका. स्टंटबाबत तुम्हाला गंभीर व्हायला हवे. मी चॅनलला विचारणार नाही. तसेच कोणाला न विचारता, तुम्हाला थेट शोच्या बाहेर काढेल, असा इशारा त्यांनी प्रतीकला दिला.

Web Title: Khatron Ke Khiladi 12 Rohit Shetty Reaction On Prateek Sahajpal

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..