KKK12 : कॅप्टन्सी टास्कमध्ये २ स्पर्धक जिंकले, एलिमिनेशनपासूनही संरक्षण

'खतरो के खिलाडी'मध्ये नवीन टास्कमुळे रंगत
Khatron Ke Khiladi 12 News
Khatron Ke Khiladi 12 Newsesakal

Khatron Ke Khiladi 12 : खतरों के खिलाडी १२ च्या शनिवारच्या एपिसोडमध्ये रोहित शेट्टी (Rohit Shetty) यावेळी वेगळे प्रकारचा स्टंट घेऊन आला. या आठवड्यात 'टीम्स वीक' आहे. स्पर्धकांना टीमसाठी खेळावे लागणार होते. त्याचा फायदा त्यांच्या पूर्ण टीमला होईल.

रोहित शेट्टी म्हणाला, आतापर्यंतचे सर्व पर्वात हे पहिल्यांदाच होतेय की कॅप्टन निवडण्यासाठी स्टंट होत आहे. सर्व १० स्पर्धकांना लाल आणि पिवळ्या टीममध्ये विभागले गेले आणि सर्वांना बरोबरच स्टंट करायचे होते. याबरोबरच जो कॅप्टन होईल त्याला एलिमिनेशनपासूनही संरक्षण मिळेल. (Khatron Ke Khiladi 12 Tushar Kalia And Mohit Malik Win The Captaincy Stunt)

Khatron Ke Khiladi 12 News
आमिरच्या 'लालसिंग चड्ढा'वर अन्नू कपूरची अजब प्रतिक्रिया ! तो कोण आहे?

कोण झाला कॅप्टन ?

कॅप्टन टास्कमध्ये प्लॅटफाॅर्मला हवेत लटकवले गेले आणि खाली पाणी होते. प्लॅटफाॅर्मच्या दोन्ही बाजूला दोन टीमच्या स्पर्धकांना बसवले गेले. प्लॅटफाॅर्म हळूहळू एकीकडे झुकतो आणि स्पर्धकांना स्वतःला पाण्यात पडण्यापासून स्वतःला वाचवायचे आहे. जसे प्लॅटफाॅर्म एकीकडे झुकण्यास सुरुवात होते तसे एकेक स्पर्धक पाण्यात पडतो.

स्टंटच्या शेवटी मोहित मलिक आणि तुषार कालिया राहतात. आणि अखेर मोहितही पाण्यात पडतो आणि तुषार सुरक्षित राहतो. मोहित लाल टीम, तर तुषार पिवळ्या टीमचा सदस्य असतो. या प्रकारे मोहित आणि तुषार आपापल्या टीमचे कॅप्टन म्हणून निवडले जातात. तुषार पाण्यात पडत नाही. त्यामुळे त्याच्या टीमला १० पाॅईन्ट्स मिळतात. (TV Entertainment News)

Khatron Ke Khiladi 12 News
बाॅलीवूडमधील जिवलग मित्र, पडद्याबरोबरच खऱ्या आयुष्यातही देतात साथ

मोहितची टीम विजयी

कॅप्टनला पुढील स्टंटसाठी कोणाला पाठवता येईल याचे अधिकार दिले गेले. मोहितने आपल्या टीममधील फैजू, जन्नत जुबैर आणि कनिका मानला स्टंट करण्यासाठी पाठवले. तुषारने आपल्या टीममधील निशांत भट, सृति झा आणि चेतना पांडे यांना निवडले. हा स्टंट मोहितच्या टीमने जिंकला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com