बाॅलीवूडमधील जिवलग मित्र, पडद्याबरोबरच खऱ्या आयुष्यातही देतात साथ | Friendship Day | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akshay Kumar And Sunil Shetty

बाॅलीवूडमधील जिवलग मित्र, पडद्याबरोबरच खऱ्या आयुष्यातही देतात साथ

Friendship Day : बाॅलीवूड तारे चित्रपटांव्यतिरिक्त आपल्या खासगी आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतात. ती आपल्या मैत्रीसाठीही ओळखले जातात. चित्रपटातच नव्हे तर आपल्या खासगी आयुष्यातही सिनेतारेतारका जिवलग मित्र आहेत. आज बाॅलीवूडमधील काही कलाकारांच्या मैत्रीविषयी आम्ही सांगणार आहोत... (Friendship Day Best Friends In Bollywood And Real Life)

हेही वाचा: Friendship Day: आदित्य आणि दिशा यांच्या मैत्रीची आजही चर्चा, तीन वर्षांपूर्वी गाजला होता किस्सा

अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि सुनील शेट्टीने बाॅलीवूडमध्ये (Bollywood) अनेक चित्रपटांमध्ये बरोबर काम केले आहे. यात मोहरा, वक्त हमारा है आणि हेरा फेरी यासारख्या मोठ्या हिट चित्रपटांचा समावेश आहे. दोघांनीही इतक्या चित्रपटांमध्ये काम केले की दोघांमध्येही भावाप्रमाणे नाते वाढू लागले. अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी नेहमी एकमेकांच्या दुःखात सामील झालेले दिसले आहेत. सुनीलही नेहमी दुःखात सर्वांबरोबर दिसतो.

बाॅलीवूडमधील जय-वीरुची जोडी म्हणून प्रसिद्ध धर्मेंद्र आणि अमिताभ हे फार जुने मित्र आहेत. लोकांनाही त्यांची जोडी खूप आवडत असते. दोघांमध्येही भावांपेक्षा जास्त प्रेम आहे. बाॅलीवूडमधील मित्रांमध्ये सर्वात जुनी जोडी म्हणून धर्मेंद्र आणि अमिताभ यांनाच ओळखले जाते. प्रेमाबरोबरच दोघांमध्ये खूप विश्वासही आहे. अमिताभ वयाने धर्मेंद्रपेक्षा छोटे आहेत. (Best Friends In Bollywood)

हेही वाचा: Friendship day: नाना पाटेकर अशोक मामांचे पाय चेपायचे, आजही आहे घट्ट मैत्री

बाॅलीवूडचा आणखी एक याराना जोडी सलमान खान आणि संजय दत्त यांची आहे. दोघांनीही चित्रपट चल मेरे भाईत बरोबर काम केले होते. सलमान संजयला आपला मोठा भाऊ मानतो. एवढेच नव्हे तर दोघांनाही नेहमी घरात पार्टी करताना पाहिले गेले आहे. सलमानने पहिल्यांदा संजय दत्तला 'बाबा' म्हणून संबोधल होते. तेव्हापासून संजयला बाॅलीवूडचा बाबा म्हटले जाऊ लागले.

Web Title: Friendship Day Best Friends In Bollywood And Real Life

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..