Sidharth-Kiara Wedding meme: लग्न उरकताचं भाईजान अन् बॉलिवूडवर भन्नाट मीम्स व्हायरल

Sidharth-Kiara Wedding meme
Sidharth-Kiara Wedding memeEsakal

बॉलीवूडचं प्रसिद्ध जोडपं अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी या दोन्ही सेलिब्रेटींच्या लग्नाची चर्चा गेल्या बऱ्याच दिवसांपासून होती. अखेर ते विवाहबंधनात अडकले आहेत. राजस्थानमधील जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये सिड आणि कियाराने लग्न केलं आहे. अशा परिस्थितीत बॉलिवूडचे सर्व सेलिब्रिटीही सोशल मीडियावर सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणीला लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत. सोशल मिडियावरही दोघांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहे.

Sidharth-Kiara Wedding meme
Kiara-Sidharth Wedding Photo : 'तेरी मेरी गल्लां हो गई मशहूर...' शेरशाहचा शाही विवाहसोहळा

दरम्यान या दोघांच्या फोटो सोबतच बॉलिवुडचा मोस्ट वॉन्टेट मॅन म्हणजेच सलमान खान देखील ट्रेंण्ड करत आहे. आता तुम्ही म्हणाल कियारा आणि सिडच्या लग्नाचा आणि सलमान खान यांचा काय सबंध? तर याचा संबंध असा की आता पुन्हा सलमानच्या चाहत्यांना त्याच्या लग्नाचा प्रश्न पडला आहे.

सलमान खान लग्न कधी करणार हा प्रश्न तर नेहमीच चर्चेत असतो. कारण सलमान ने आतापर्यंत ज्यांनाही डेट केले आहे, त्याच सर्वांच लग्न आता झालं आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी आता पुन्हा सलामान खानला ट्रोल करण्यास सुरवात केली आहे.

या आधीही कतरिनाच्या लग्नावेळीही सलमानवर अनेक मीम्स व्हायरल झाले होते. आता पुन्हा सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी लग्नानंतर नेटकऱ्यांनी सलमान खानवर भन्नाट मिम्स तयार केले आहेत. जे सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

Sidharth-Kiara Wedding meme
Kiara Sidharth Wedding : 'आता मी पर्मनंट तुझीच!' लग्नानंतर कियाराची पहिलीच पोस्ट, चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
Sidharth-Kiara Wedding meme
Kangana On Sid-Kiara Wedding: सिद्धार्थ-कियाराला शुभेच्छा देतांना कंगनाचा आलियाला अप्रत्यक्ष टोमणा..

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या मीम्समध्ये सलमान खान अजूनही सिंगल असल्याचं म्हणतं त्याच्यावर विनोद करण्यात आला आहे. बिग बॉसमध्ये सिद्धार्थ मल्होत्राच्या लग्नाचा इशारा देणारा पहिला व्यक्ती सलमान खान होता, अशीही माहिती आहे. त्यामुळे फक्त दुसऱ्याच्या लग्नाबद्दलचं चर्चा करणार का ? असा सवाल नेटकरी त्याला करत आहेत. तर सलमानसोबतच इतर कलाकारांवरही मिम्स व्हायरल होत आहेत.

मात्र बऱ्याच प्रतीक्षेनंतरही तो विमानतळावर दिसला नाही. व्हायरल होत असलेल्या मीम्सबद्दल बोलायचे झाले तर एका मीममध्ये ऐश्वर्या-अभिषेक, विकी- कतरिना, रणबीर-आलिया आणि कियारा सिद्धार्थ यांच्या फोटोनंतर शेवटच्या मेममध्ये सलमान खानचा फोटो दाखवण्यात आला आहे.मीमवर लोकांचे हसू थांबले नाही

Sidharth-Kiara Wedding meme
Bigg Boss 16: आवाज खाली! शालिन अन् स्टॅनमध्ये पुन्हा राडा कारण टिनाचं! पत्रकारांसमोरच सुरु...

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांनी ७ फेब्रुवारीला लग्न केले. लग्नाच्या काही तासांनंतर, कियारा आणि सिद्धार्थ यांनी त्यांच्या संबंधित सोशल मीडिया हँडलवर त्यांच्या चाहत्यांसह लग्नाची पहिली छायाचित्रे शेअर केले आणि लिहिले, "आता आमची कायमची बुकिंग झाली आहे."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com