Karthik Aaryan Video: 'कसला गोड आहेस तू, तिची सँडल उचलली'!

शेरशाह फेम अभिनेत्री कियारा अडवाणी आणि शहजादा फेम कार्तिक आर्यन हे दोघेजण सत्यप्रेम की कथा या चित्रपटामध्ये दिसणार आहेत.
Karthik Aaryan Kiara Advani Satyaprem Ki Katha
Karthik Aaryan Kiara Advani Satyaprem Ki Kathaesakal

Karthik Aaryan Kiara Advani Satyaprem Ki Katha : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. त्यावरुन काहींनी कार्तिकचं कौतूक केलंय तर काहींनी त्याला ट्रोल देखील केले आहे. गेल्या काही दिवसांपासून कार्तिक आर्यन हा वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे.

शेरशाह फेम अभिनेत्री कियारा अडवाणी आणि शहजादा फेम कार्तिक आर्यन हे दोघेजण सत्यप्रेम की कथा या चित्रपटामध्ये दिसणार आहेत. त्याच्या व्हायरल झालेल्या फर्स्ट लूक आणि टीझरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाची निर्मिती प्रसिद्ध निर्माते साजिद नाडियावाला यांनी केली असून त्यातील सुन सजनी नावाचे गाणे आता प्रसिद्ध झाले आहे.

Also Read - Internet shutdown : खरोखरच इंटरनेट बंद केल्याने दंगली थांबतात का?

त्या गाण्याच्या प्रसिद्धीनिमित्तानं मुंबईमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात जे घडले त्याची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसते आहे. यापूर्वी देखील कार्तिक आर्यन हा त्याच्या अतरंगीपणामुळे चर्चेचा विषय झाला होता. बॉलीवूडमध्ये सध्याच्या घडीला सर्वाधिक लोकप्रिय असणारा अभिनेता आहे. त्याच्या याअगोदरच्या चित्रपटांना जेमतेम प्रतिसाद मिळाला असून तो आता बड्या हिटच्या प्रतिक्षेत आहे.

सत्यप्रेम की कथा या चित्रपटाच्या सुन सजनीच्या प्रमोशनच्या वेळी जे घडलं त्यामुळे अनेकांनी कार्तिकला ट्रोल केले आहे. अरे तू चक्क कियाराची सँडल उचललीस, तुला मानायला हवं. तर काहींनी त्याचे कौतूक केले आहे. तू किती गोड आहेस, कियाराची सँडल उचलून तिची मदत केलीस. त्याबद्दल तुला धन्यवाद द्यायला हवेत. अशा शब्दांत अनेकांनी कार्तिकवर कौतूकाचा वर्षाव केला आहे.

गेल्या वर्षी कार्तिक आणि कियारानं भुलभुलैय्या २ नावाचा चित्रपट केला होता. त्याची चर्चा झाली होती. मात्र तो बॉक्स ऑफिसवर फारसा हिट झाला नाही. त्यावेळी त्याच्या जोडीला इतर कोणताही चित्रपट नसल्यानं त्याला जेमतेम यश मिळाले होते. दुसरं कारण म्हणजे बऱ्याच दिवसांनी एक विनोदी चित्रपट आल्यानं प्रेक्षकांनी वेगळा ऑप्शन म्हणून या चित्रपटाची वाट धरली होती.

Karthik Aaryan Kiara Advani Satyaprem Ki Katha
Adipurush Controversy : आदिपुरुषच्या टीमला जिवंत जाळा! शक्तिमानचा संताप

आता असं म्हटलं जातंय की, कियारा आणि कार्तिकचा सत्यप्रेम की कथा हा बॉक्स ऑफिसवर हिट होईल. त्यामध्ये त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली आहे. त्याची चर्चाही होत आहे. यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या चित्रपटाच्या टीझरनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com