Kiara Advani : 'लग्न झाल्यापासून सिद्धार्थ जास्तच...'! कियारानं सांगून टाकलं

आता पहिल्यांदाच कियारानं त्या मुलाखतीतून सुरु झालेल्या नव्या प्रवासाविषयी भाष्य केले आहे.
Kiara Advani more ambitious after marriage
Kiara Advani more ambitious after marriageesakal

Kiara Advani more ambitious after marriage : शेरशाह प्रदर्शित झाला तेव्हा त्यातील कियारा आणि सिद्धार्थची केमिस्ट्री पाहून काही जणांनी अंदाज बांधला होता की, हे दोन्ही सेलिब्रेटी एकमेकांच्या प्रेमात आहेत. त्यांच्या डेटिंगच्या चर्चा व्हायरल झाल्या, पुढे लग्न करणार असल्याची बातमी समोर आली आणि चाहत्यांना कमालीचा आनंद झाला.

कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नाची मोठी चर्चा झाली होती. त्यांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठीची चाहत्यांची उत्सुकता दिसून आली होती. शेरशाहमधील त्या गाण्यावर व्हायरल झालेला तो व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला.त्यावरील प्रतिक्रियाही भन्नाट होत्या. लग्नानंतर कियारा काही चित्रपटांमध्येही दिसली. सध्या तिनं एका मुलाखतीमध्ये दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. त्यात तिनं लग्नाविषयी काही टिप्पणी केली आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

फेब्रुवारीमध्ये राजस्थानमधील जैसलमेर येथील सुर्यगढ पॅलेसमध्ये त्यांनी लग्न केले होते. हे दोन्ही सेलिब्रेटी कायमच एकमेकांप्रती वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आले असून त्यात त्यांनी नात्यातील विश्वास, प्रेम याविषयी आपली मतं मांडली आहेत. आता पहिल्यांदाच कियारानं त्या मुलाखतीतून सुरु झालेल्या नव्या प्रवासाविषयी भाष्य केले आहे. आमच्या दैनंदिन वागण्यात बराचसा बदल झाला आहे. पूर्वीची गोष्ट वेगळी होती. आता तो बदल जाणवतो आहे.

Kiara Advani more ambitious after marriage
Niyat Movie Review : कमजोर कथेमुळे निराश करणारा चित्रपट!

काही दिवसांपूर्वी कियारा आणि कार्तिक आर्यनचा सत्यप्रेम की कथा नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. त्याला बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळाल्याचे दिसून आले. त्यावेळी कियारानं लग्न झाल्यानंतर सिद्धार्थ खूपच बदलल्यासारखा वाटतो आहे. तो आणखी फोकस झाला आहे. कामाप्रती जागरुक आहे. नवनवीन प्रोजेक्टस् त्याच्याकडे असून त्याविषयी तो अधिक विचार करतो आहे. सिद्धार्थ खूपच महत्वकांक्षी झाला आहे. असे ती म्हणते.

Kiara Advani more ambitious after marriage
Akshay Kumar : अक्षय धुतल्या तांदळाचा नाही, बॉलीवूडमधील एका अभिनेत्रीला त्यानं...

मी त्याला त्याची स्पेस आणखी इंजॉय करु देत आहे. ती चांगली गोष्ट आहे. आपण जेव्हा वेगळ्या दृष्टीकोनातून विचार करतो, त्याचा फायदा होतो. आम्ही एकमेकांशी संवाद साधत असतो. मला त्याला एक सांगायचे आहे ते म्हणजे त्यानं थांबू नये, त्याला जे वाटते ते त्यानं करावं. हे जास्त महत्वाचे आहे. असेही कियारानं यावेळी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com