Kili Paul video Viral : किली पॉलचा 'गदर', सनीच्या गाण्यावर थिरकला! धर्मेंद्र यांनी केलं कौतूक, तू तर..

भारत आणि पाकिस्तान या विषयावर केंद्रीत असलेल्या गदरचा दुसरा भाग ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Kili Paul video Viral Mein Nikala Gaddi Leke Dharmendra
Kili Paul video Viral Mein Nikala Gaddi Leke Dharmendra esakal

Kili Paul video Viral Mein Nikala Gaddi Leke Dharmendra : बॉलीवूडच्या प्रेक्षकांना आता उत्सुकता आहे ती सनी देओलच्या गदर २ चित्रपटाची. तब्बल दोन दशकानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यात सनी आणि अमिषा एका वेगळ्या रुपात दिसणार आहे. अनिल शर्मा यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटातील गाणी, टीझर प्रेक्षकांना कमालीचे आवडले आहेत.

भारत आणि पाकिस्तान या विषयावर केंद्रीत असलेल्या गदरचा दुसरा भाग ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या ट्रेलरनं वेगळ्याच चर्चेला उधाण आले होते. अशातच कपिल शर्माच्या शो मध्ये सनीनं गदर च्या पहिल्या पार्टच्यावेळी आपल्याला बॉलीवूडनं कशाप्रकारे बॉयकॉट केले होते हा अनुभव सांगून प्रेक्षकांना मोठा धक्का दिला होता. खरंतर त्यावेळी सनीचा गदर आणि आमिरचा लगान हे एकाचवेळी प्रदर्शित झाले होते.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

लगाननं भलेही ऑस्करपर्यत मजल मारली असेल पण गदरनंही प्रेक्षकांची मनं जिंकली होती. लगानला काही ऑस्कर मिळाला नाही पण त्यानं गदरशी थेट पंगा घेतला होता. त्याचा सनीला राग असल्याचे अजूनही बोलले जाते. अशाप्रकारच्या वेगवेगळ्या गप्पागोष्टी गदरच्या दुसऱ्या भागाच्या निमित्तानं सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांनी एक व्हिडिओ शेयर केला आहे.

धर्मेंद्र यांनी प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्ल्युंसर किली पॉलच्या डान्सचा तो व्हिडिओ व्हायरल केला आहे. त्यात तो सनी देओलच्या मैं निकला गड्डी लेके गाण्यावर डान्स करतो आहे. धर्मेंद्र यांनी किली पॉलचे कौतूक केले आहे. बाकीच्या नेटकऱ्यांनी देखील किलीच्या त्या डान्सवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहे.

Kili Paul video Viral Mein Nikala Gaddi Leke Dharmendra
Oppenheimer Review : अमेरिका जशी डोक्यावर घेते तशीच ती...! 'ओपनहायमर'ला बोटावर नाचवलं

यापूर्वी देखील किली आणि त्याच्या बहिणीनं बॉलीवूडमधील वेगवेगळ्या गाण्यांचे मीम्स आणि व्हिडिओ व्हायरल केले आहे. जगाच्या पाठीवर भारतातून किलीला फॉलो आणि लाईक्स करणाऱ्या चाहत्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्या व्हिडिओवर किलीला आलेल्या प्रतिक्रियाही भन्नाट आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com