esakal | शेवटी ठरलं, फॅन्स म्हणाले ही तर 'रब ने बना दी जोडी'
sakal

बोलून बातमी शोधा

शेवटी ठरलं, फॅन्स म्हणाले ही तर 'रब ने बना दी जोडी'

शेवटी ठरलं, फॅन्स म्हणाले ही तर 'रब ने बना दी जोडी'

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री किम शर्मा ही नेहमीच चर्चेत असते. तिचे आतापर्यत अनेक सेलिब्रेटींशी नाव जोडले गेले. एका प्रख्यात क्रिकेटपटूशीही तिचं नाव जोडलं गेलं होतं. मात्र आपल्या बोल्ड आणि बिनधास्तपणासाठी किम शर्मा ही नेहमीच वादात सापडलेलं नाव आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तिच्या आणि प्रसिद्ध टेनिसपटू लिएंडर पेसच्या नावाची चर्चा होती. त्या दोघांना अनेकदा एकत्र फिरताना चाहत्यांनी आणि फोटोग्राफर्सनं पाहिलं. त्यांच्या कॅमेऱ्यात ते कैद झाले होते. ते फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचेही दिसून आले. सुरुवातीला त्याबाबत फक्त चर्चा होती. आता मात्र त्यावर अधिकृतपणे भाष्य किमनं केलं आहे. ती काय म्हणाली हे आपण माहिती करून घेणार आहोत.

मोहब्बते मध्ये किम शर्मा जेव्हा प्रेक्षकांना दिसली तेव्हापासून तिनं एक वेगळी ओळख प्रेक्षकांच्या मनात निर्माण केल्याचे दिसुन आले आहे. काही दिवसांपासून तिच्या आणि लिएंडर पेसच्या अफेयरची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. अखेर त्या रिलेशनशिपला किमनं आपली संमती दर्शवली आहे. तिनं याबाबत एक पोस्टही शेयर केली आहे. त्याची सगळीकडे चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या दोघांच्या रिलेशनशिप विषयी चर्चा होती. त्यांचा एक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात लिएंडर पेस आणि किम शर्मा हे त्यांच्या पेट अॅनिमल सोबत फिरताना दिसत आहे.

हेही वाचा: 'अजून किती बॉयफ्रेंड करशील'? किम शर्मा ट्रोल

हेही वाचा: लिएंडर पेस युवराज सिंगच्या एक्स गर्लफ्रेंडच्या प्रेमात?

किमनं लिएंडर पेस सोबतचा एक फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन प्रसिद्ध केला आहेय आणि एक लव बर्डसचा इमोजीही शेयर केला आहे. त्यावरुन फॅन्सनं अंदाज बांधला आहे की, यांचे ठरले आहे. त्यांनी त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे कमेंट केल्या आहेत. त्यात एका युझर्सनं रब ने बना दी जोडी असे म्हटले आहे. अनेकांनी त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी ते दोघेही गोव्याला व्हॅकेशनसाठी गेले होते. तिथले फोटो व्हायरल झाले होते. किम आणि लिएंडर या दोघांचेही यापूर्वी घटस्फोट झाले आहेत. किम यापूर्वी हर्षवर्धन राणेला डेट करत होती.

loading image
go to top