Bigg Boss Marathi 4: खोटारडा किरण.. तर विश्वासघातकी, दुतोंडी अमृता.. दोघांमध्ये खडाजंगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kiran mane and amruta dhongade fight bigg boss marathi 4

Bigg Boss Marathi 4: किरण खोटारडा.. तर अमृता विश्वासघातकी, दुतोंडी.. दोघांमध्ये खडाजंगी

bigg boss marathi : बिग बॉस मराठीचे चौथे पर्व सुरू होऊन आता साठ दिवसांचा टप्पा पार झाला आहे. तर या पर्वाला पहिले टॉप 10 स्पर्धक मिळाले आहेत. त्यामुळे घरामध्ये एकमेकांच्या विरोधात चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. प्रत्येक टास्क मध्ये आपल्याला चढाओढ दिसत आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपणच कसे सरस आहोत ही दाखवण्याच्या प्रयत्नात आहेत. परिणामी त्यावरून राडा घालायलाही ते मागे पुढे पाहत नाहीत. अशातच काल अमृता धोंगडे आणि किरण माने यांच्यात जोरदार बाचाबाची झाली.

(kiran mane and amruta dhongade fight bigg boss marathi 4)

हेही वाचा: Urfi javed: उर्फीला होतोय मच्छरांचा त्रास.. म्हणून घालून आली..

अमृताच्या नावाखाली किरण माने यांनी अपूर्वा आणि अक्षयला काढून टाकण्याबाबत वक्तव्य केले. पण मी तसे बोललेच नाही असे अमृताचे म्हणणे आहे. त्यामुळे याबाबत ती विकासला जाब विचारते. अमृता धोंगडे विकासला विचारते, विकास तु सांग.. मी असं काही बोलले का.. त्यावर विकास म्हणतो.. दाद्याल येऊ दे... मग अमृता म्हणाली, तू होतास ना तिथे तू सांग कि मी कधी नाव घेतलं कि आपण अक्षय, अपूर्वाला काढायचं म्हणून...

पुढे अमृता म्हणते.. विकास तू मला खात्रीने सांगायचं... हो.. मी नावं घेतलेलं असं.. दाद्याच्या मागे मागे करू नकोस. विकास म्हणाला, दाद्या बोल... किरण माने म्हणाले, विश्वासघातकी मुलीबरोबर मला बोलायचं नाही... दुतोंडी आणि विश्वासघातकी ही... अमृता धोंगडे त्यावर म्हणाली, मला तुमच्यासारख्या खोटारड्या माणसाशी बोलायचे नाही... खोटारडा माणूस एक नंबरचा. किरण माने म्हणाले, विश्वासघातकी पोरगी... असल्या पोरीशी काय बोलतो आहेस, मला नाही बोलायचं. अमृता म्हणाली, निघा मग. किरण माने यांनी बोलावताच विकास पण निघाला... त्यावर अमृता म्हणाली, तू पण जा त्यांच्या मागे.. हेच करत आला आहेस... पळपुटे...

हेही वाचा: Bigg Boss Marathi 4: तर.. हात उचलण्याच्या लायकीचा नाही रहणार.. प्रसाद-अक्षयमध्ये हाणामारी..

एरव्ही एकमेकांसाठी डोळ्यात पाणी आणणाऱ्या, बहीण भावाचे नाते सांगणाऱ्या किरण आणि अमृतामध्ये चांगलीच दुफळी पडली आहे. आता हा वाद नक्की किती वाढतोय आणि त्याचा त्यांच्या खेळावर काय परिणाम होतोय ही येत्या आठवड्यात कळेल..

टॅग्स :Big Bossbigg boss marathi