Bigg Boss 16: आम्हाला नाय फरक पडत.. शिव ठाकरे बद्दल किरण माने जरा स्पष्टच म्हणाले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shiv thakare, bigg boss 16, kiran mane

Bigg Boss 16: आम्हाला नाय फरक पडत.. शिव ठाकरे बद्दल किरण माने जरा स्पष्टच म्हणाले

Bigg Boss 16 Shiv Thakare: यंदा एक महिना वाढलेल्या बिग बॉस १६ ची ग्रँड फिनाले संपन्न झाली. या ग्रँड फिनालेच्या ट्रॉफीवर एम. सी. स्टॅनने स्वतःचं नाव कोरलंय. मराठमोळा शिव ठाकरे बिग बॉस १६ मध्ये उपविजेता ठरला.

अनेकांना वाटत होतं कि शिव ठाकरे बिग बॉस १६ ची ट्रॉफी पटकावेल. पण शिवला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं.

शिव उपविजेता झाल्यावर सर्वच कलाकार आणि सामान्य माणूस शिवबद्दल चर्चा करत आहेत. अशातच अभिनेता आणि बिग बॉस मराठी ४ मध्ये टॉप ३ पर्यंत गेलेले अभिनेते किरण माने यांची एक पोस्ट चर्चेत आहे.

(kiran mane comment on shiv thakare bigg boss 16 journey )

किरण माने यांनी सोशल मीडियावर शिवचा एक फोटो पोस्ट केलाय. त्या फोटोखाली शिवसाठी एक खास कॅप्शन लिहिलंय. याद उसी को रखा जाता है, जिसने 'दिल' जिता हो... फर्क नही पड़ता, हाथ में ट्राॅफी हो, या ना हो ! शिव, भावा मस्त खेळलास. लै भारी. अशी पोस्ट किरण माने यांनी शिवसाठी लिहिलीय आहे. शिवचं विजेतेपद थोडक्यात हुकलं म्हणून किरण माने यांना वाईट वाटलेलं दिसतंय.

शिव ठाकरेने बिग बॉस मराठी २ जिंकलं. तेव्हापासून शिव आणि किरण यांची चांगली मैत्री आहे. किरण माने शिवला बिग बॉस १६ साठी कायम सपोर्ट करताना दिसले आहेत. अनेकांना शिव जिंकेल अशी अपेक्षा होती. तशीच अपेक्षा किरण माने यांनाही असावी. पण शिवचं विजेतेपद गेल्यामुळे किरण माने यांनी त्यांना धीर देणारी पोस्ट लिहिली आहे.

हि पोस्ट वाचल्यानंतर "किरण माने तुम्ही सुद्धा बिग बॉस मराठी ४ च्या विजेतेपदासाठी लायक होता. पण तुम्हाला सुद्धा शिव ठाकरे सारखं विजेतेपद मिळालं नाही", अशा कमेंट किरण माने यांच्या फॅन्सनी त्यांच्यासाठी केल्या आहेत. एम. सी स्टॅनने बिग बॉस १६ च्या विजेतेपदावर स्वतःचं नाव कोरलं तर अक्षय केळकरने बिग बॉस मराठी ४ चं विजेतेपद पटकावलं.

टॅग्स :Big BossShiv Thakare