Kiran Mane: आणि आईचं स्वप्न किरण मानेंनी पूर्ण केलं.. रितेश देशमुख सोबत खास कनेक्शन

बिग बॉस निमित्ताने किरण माने यांचं स्वप्न पूर्ण झालंच पण त्यांच्या आईचंही स्वप्न पूर्ण झालं.
kiran mane on riteish deshmukh when his mother dream come true
kiran mane on riteish deshmukh when his mother dream come trueSAKAL

Kiran Mane on Riteish Deshmukh News: किरण माने हे बिग बॉस मराठी ४ मुळे चर्चेत आले. किरण माने यांनी वयाच्या ५२ व्या वर्षी स्वतःच्या खेळाने सर्वांना चकित केले.

किरण माने यांनी आजवर अनेक मालिका, सिनेमे आणि नाटकांमध्ये अभिनय केलाय. किरण माने जेव्हा बिग बॉसच्या घरात होते तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राने त्यांना डोक्यावर घेतलं. बिग बॉस निमित्ताने किरण माने यांचं स्वप्न पूर्ण झालंच पण त्यांच्या आईचंही स्वप्न पूर्ण झालं.

(kiran mane on riteish deshmukh when his mother dream come true)

kiran mane on riteish deshmukh when his mother dream come true
Bigg Boss OTT: काहीच तासाच पुनीत सुपरस्टारला फेकलं घराबाहेर, केली मोठी चुक

किरण माने यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केलाय. या व्हिडिओत रितेश देशमुख आणि जिनिलिया जेव्हा बिग बॉसच्या घरात आले होते तेव्हाचा तो व्हिडिओ आहे.

या व्हिडिओत किरण माने बिग बॉसच्या घरात रितेशचं कौतुक करतात. मराठीत एका रोमँटिक हिरोची कमी होती पण, रितेश निमित्ताने ती उणीव पूर्ण झाली असं माने रितेश - जिनिलियाला म्हणाले.

हा व्हिडिओ शेअर करत किरण माने लिहितात.. ...कधी-कधी आपल्या काळजाच्या जवळच्यांचं एखादं छोट्टंसं स्वप्न आपण पूर्ण करू शकतो तवा जे समाधान मिळतं ते शब्दांत नाय सांगू शकत !

माझी आई रितेश देशमुखची लै मोठ्ठी फॅन ! मी एकदा तरी रितेशला भेटावं अशी तिची लै लै म्हंजी लैच इच्छा होती. 'बिगबाॅस'नं ती इच्छा पूर्ण केली.

kiran mane on riteish deshmukh when his mother dream come true
Adipurush Box Office: प्रेक्षकांची नाराजी.. आकडा घसरला, दुसऱ्या दिवशी झाली फक्त इतकी कमाई

किरण माने पुढे लिहितात.. रितेशला मी जेव्हा हे सांगीतलं तेव्हा रितेशनं मला मिठी मारून कॅमेर्‍याच्या लेन्समध्ये बघितलं आणि म्हणाला, "आईS नमस्कार." ...घरातले सांगतात,

त्यादिवशी आई खूप खुश होती !लब्यू बिगबाॅस... लब्यू रितेश. अशी पोस्ट किरण माने यांनी शेअर केलीय.

अलीकडेच किरण माने रावरंभा सिनेमात झळकले होते. याशिवाय माने लवकरच एका मराठी मालिकेत दिसणार असून महेश मांजरेकरांच्या आगामी सिनेमात झळकणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com