Bigg Boss OTT: काहीच तासाच पुनीत सुपरस्टारला फेकलं घराबाहेर, केली मोठी चुक

पुनीत सुपरस्टारनेही शोमध्ये प्रवेश केला. पण खेदाची गोष्ट म्हणजे, तो या शोचा जास्त काळ भाग होऊ शकला नाही
 Puneet Superstar Eliminated From bigg boss ott Salman Khan
Puneet Superstar Eliminated From bigg boss ott Salman KhanSAKAL

Bigg Boss OTT Eliminated News: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने बिग बॉस ओटीटीमधून पदार्पण केले आहे. बिग बॉस १६ चं होस्टिंग केल्यानंतर सलमान आता बिग बॉस ओटीटीच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.

Bigg Boss OTT शोचा भव्य प्रीमियर पार पडला आणि यावेळी शोचे सर्व स्पर्धक हजर झाले. सलमान खानने सर्व स्पर्धकांची चाहत्यांना ओळख करून दिली. पण आता पहिल्याच दिवशी या शो मधून एका स्पर्धकाला घराबाहेर जावं लागलं आहे.

(bigg boss ott Puneet Superstar Eliminated From Salman Khan)

पुनीत सुपरस्टारनेही शोमध्ये प्रवेश केला. पण खेदाची गोष्ट म्हणजे, तो या शोचा जास्त काळ भाग होऊ शकला नाही. शो मधील सदस्यांच्या परस्पर संमतीने त्याला काढून टाकण्यात आले.

खरं तर, शोच्या सुरुवातीलाच पुनीत त्याच्या कृत्यांमुळे बिग बॉसच्या निशाण्यावर आला होता. त्याचे वागणं कोणालाच आवडले नाही.

तो सातत्याने अपशब्द वापरत होता, तसेच घराची तोडफोडही करत होते. यामुळे त्याचे खूप नुकसान झाले आणि घरात प्रवेश केल्यानंतर एका दिवसातच त्याला शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

 Puneet Superstar Eliminated From bigg boss ott Salman Khan
Adipurush Box Office: प्रेक्षकांची नाराजी.. आकडा घसरला, दुसऱ्या दिवशी झाली फक्त इतकी कमाई

बिग बॉसने पुनीत सुपरस्टारला सतत वॉर्निंग दिली होती आणि सांगितले की, जर त्याने शोमध्ये आपली वागणूक बदलली नाही तर त्याचे परिणाम त्याला भोगावे लागू शकतात, असं बिग बॉसने वारंवार तिला सांगितलं.

अखेर सातत्याने करत असलेल्या गैरवर्तवणुकीमुळे बिग बॉस ओटीटी सीझन 2 मध्ये, घरातील सदस्यांनी पुनीत सुपरस्टारच्या विरोधात मतदान केले आणि त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

मनोरंजन विश्वातील सर्वात लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो बिग बॉस आता टिव्हीनंतर ओटीटीवरही वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. हा शो अनेक नवीन बदलांसह सुरू झाला आहे.


ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com