सतत वादात अडकणारे किरण माने 'बिग बॉस'च्या घरात? स्पर्धकांची नावे झाली लिक.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kiran mane participate in bigg boss marathi season 4

सतत वादात अडकणारे किरण माने 'बिग बॉस'च्या घरात? स्पर्धकांची नावे झाली लिक..

bigg boss marathi : अभिनेता किरण माने नेहमीच काहीना काही कारणाने वादात असतात. (kiran mane) केवळ मराठीच नाही तर अवघ्या मनोरंजन विश्वला ठाऊक असलेले ते अभिनेते आहेत. त्यांचे 'मुलगी झाली हो' हे मालिका प्रकरण बरेच गाजले. ते सतत नव्या विषयावर अत्यंत धिटाईने लिहीत असतात. केंद्र सरकारला धारेवर धरणारी विधाने करत असतात. त्यांच्या राजकीय विधानांमुळेही अनेकदा वाद झाले आहेत. असे नेहमीच चर्चेत आणि वादात असणारे व्यक्तिमत्त्व आता बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात दिसणार अशी चर्चा सुरू आहे. (kiran mane participate in bigg boss marathi season 4)

‘बिग बॉस’चे तीनही पर्व हिट ठरल्यानंतर आता लवकरच चौथे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या २ ऑक्टोबरपासून हा कार्यक्रम सुरु होणार आहे. तर महेश मांजरेकर या पर्वाचे सूत्रसंचालन करणार आहेत. वाद, भांडण, दंगा, प्रेम याने प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारा हा खेळ बराच लोकप्रिय आहे. हा शो काही दिवसांवर आल्याने आता नेमके कोणते कलाकार स्पर्धेत सहभागी होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. त्यातील काही नावे समोर आली असून प्रेक्षक त्या नावांची खात्री करून घेत आहेत.

एका माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात सहभागी होण्यासाठी अभिनेते किरण माने यांना विचारणा केली आहे. सध्या किरण माने हे ही ऑफर स्विकारायची की नाही याबद्दल विचार करत आहेत. तर दुसरीकडे निर्माते हे त्यांना या शो मध्ये आणण्यासाठी सर्वतोपारी प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे.' त्यामुळे कायम चर्चेत असलेले किरण माने बिग बॉस मध्ये येणार का, याची उत्कंठा प्रेक्षकांनाही लागली आहे.

याशिवाय स्वराज्य रक्षक फेम प्राजक्ता गायकवाड, देवमाणूस फेम नेहा खान, 'तुझ्यात जीव रंगला' फेम हार्दिक जोशी, ओंकार शिंदे, अनिकेत विश्वासराव, 'लागीर झालं जी' मधील निखिल चव्हाण, यशोमान आपटे, 'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील अण्णा म्हणजेच माधव अभ्यंकर यांनाही विचारणा केली असल्याची माहिती मिळाली आहे. अद्याप वाहिनीने याबाबत खुलासा केला नसला तरी यातील बरेच चेहरे बिग बॉस मराठीच्या घरात दिसतील.

Web Title: Kiran Mane Participate In Bigg Boss Marathi Season 4

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :bigg boss marathi