Women's Day 2023: काम करणारे पुरुष.. महिला दिनी Kiran Mane यांची पोस्ट ठरली चर्चेचा विषय..

अनेक गोष्टींचा त्याग ती करतेच पण.. महिला दिनी किरण माने यांनी वेधलं नेटकाऱ्यांचं लक्ष..
Kiran Mane shared post for working women struggle on international women's day 2023
Kiran Mane shared post for working women struggle on international women's day 2023 sakal

Kiran Mane on international women's day : आज जागतिक महिला दिन. या दिवशी जगभरात स्त्रीशक्तीचा जागर केला जातो. चौकटी भेदून बाहेर पडलेल्या आणि विविध क्षेत्रात विक्रमी कामगिरी करणाऱ्या महिलांचा आज आवर्जून गौरव केला जातो.

स्त्री जातीचा संघर्ष कमी होऊन पुरुष समानता यावी यासाठी अनेक जन आजही प्रयत्न करत आहेत, त्यासाठीच मोलाचा मानला जाणारा आजचा दिवस. या दिवस अनेक कलाकार आपल्या भावना व्यक्त करत असतात. लिहीत असतात. कुणी आपले अनुभव सांगतं तर कुणी एखादा संदेश देतं.. अशीच एक मोलाची पोस्ट अभिनेते किरण माने यांनी केली. जी सध्या चर्चेचा विषय ठरते आहे.

(Kiran Mane shared post for working women struggle on international women's day 2023 )

Kiran Mane shared post for working women struggle on international women's day 2023
Vanita Kharat: वनिता खरातला पाहण्यासाठी लोकांची गर्दी! थेट चाळीत जाऊन साजरी केली पहिली होळी..

गेली काही दिवस किरण माने बरेच चर्चेत आहेत, सुरवातीला वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे किरण माने सध्या बिग बॉस मुळे चर्चेत आहे. मुंबईत सह ग्रामीण भागात त्यांची प्रचंड हवा आहे.

किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सातत्याने ते काहीना काही पोस्ट करत असतात. आज त्यांनी महिला दिनाच्या निमित्ताने एक पोस्ट लिहिली आहे. ते म्हणतात,

''..ती गाढ झोपेत असते. अचानक कानात मोबाईल 'आरवू' लागतो. झोपेतच ती वैतागते. डोळे तसेच मिटून, हाताने मोबाईल चाचपून अलार्म 'ऑफ' करणार, तेवढ्यात तिचा मेंदू 'ऑन' होऊन तिला वाॅर्निंग देतो, "अगं ए..उठ. आज रेवाला सकाळची शाळाय !"... ती ताडकन उठून बसते... दिवसभरातल्या अनेक कामांची लिस्ट तिच्या डोक्यात स्क्रोल होऊ लागते...एका 'वर्किंग वूमन'चा दिवस भल्या पहाटे सुरू होतो !''

Kiran Mane shared post for working women struggle on international women's day 2023
Jiv Ranglay Go: बिग बॉस मधली 'ही' जोडी म्हणतेय 'जीव रंगलाय गो'.. जय दुधाने आणि मीरा जगन्नाथ एकत्र..

''किचनमध्ये आल्या-आल्या अनेक प्रश्नांची मालिका मनात सुरू होते. नाष्टा काय करायचा? दुपारच्या जेवणाचं काय? मला १० वाजता कामावर जायचंय त्याआधी संध्याकाळच्या जेवणाची काय तयारी करायची??? हे सुरू असतानाच ती किचनमधली रात्रीची भांडी जेवढी गरजेची असतील ती धुवून टाकते.. एकीकडे चहाचे आधण ठेवते... फ्रिजमधून दूध काढून तापायला ठेवते...आज कामवालीही येणार नाही म्हणून झाडू मारायला घेते. "रेवा उठ, सकाळ झाली. स्कूलमध्ये जायचं नाही का?" असं साधारणपणे दहावेळा ओरडल्यावर आणि एकदा तिला गदागदा हलवून उठवल्यावरच ती जागी होते.''

''...सगळं आवरून रेवाला शाळेत पाठवण्याचं मोठं काम पार पडल्यानंतर दोन घटका शांतपणे ती खुर्चीत बसते. चहाचा पहिला घोट घेतानाच तिच्या मैत्रीणीचे, वैशालीचे शब्द तिला आठवतात, "नेहा, सकाळ सकाळी जिर्‍याचं पाणी पित जा. चमचाभर जिरे आदल्या रात्री भिजत ठेवायचे. तब्येतीसाठी चांगलं असतं." ती मनातल्या मनात म्हणते, "रात्री विसरलेच. उद्यापासून सुरू करेन." असं ती रोज ठरवतेय.''

''...पण विशेष म्हणजे आपल्या कुटूंबाची काळजी घेताना, त्यासाठी धडपडताना तिची अजिबात तक्रार नसते बरं का ! मुळात तिला आपण हे वेगळं काहीतरी करतोय असं वाटतच नसतं. पण त्याचवेळी ती थकली असेल, तिला मदत करू असा विचार करणारे तिचे कुटूंबीय खूप कमी असतात हे ही खरं... असो.''

''...तर नवर्‍याच्या ब्रेकफास्टपासुन टिफीनपर्यन्तचे सगळे सोपस्कार पार पाडून ती तिच्या आयुष्यातली तिची दुसरी भुमिका साकारण्यासाठी सज्ज होते... बॅंकेतील क्लार्कची ! बॅंकेत पोहोचल्यावरही ती अनेक जबाबदार्‍या खांद्यावर घेते. बँकेतील व्यवहार हाताळणे, कॅश मोजून माहिती काॅम्प्यूटरमध्ये भरणे, ज्या वयोवृद्ध, अशिक्षित ग्राहकांना फाॅर्म भरण्यात अडचण येते त्यांना मदत करणे, पासबुकांची एंट्री करून देणे, याशिवाय कुणाला कुठल्या स्कीमबद्दल माहीती हवी असल्यास ती देणे...पूर्ण दिवसभर इथेही ती तशीच उत्साहाने सळसळणारी असते !''

Kiran Mane shared post for working women struggle on international women's day 2023
Sushmita Sen: हार्ट अटॅकनंतर एका आठवड्यातच सुश्मिताचं वर्कआऊट सुरू.. चाहते म्हणाले, तू तर..

''अशा अनेक वर्किंग विमेन आज आपल्या आसपास आहेत. एक उदाहरण म्हणून मी बॅंक घेतलं. क्षेत्र कुठलंही असो, दिनचर्या हीच असते...आपलं कौटुंबिक आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य याची सांगड घालताना वर्किंग वुमनला अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. सगळ्यात महत्त्वाचा त्याग म्हणजे 'स्वत:साठीचा वेळ' !''

''...काम करणारे पुरूष आरामासाठी शनिवार रविवारची वाट पहातात. पण वर्किंग वुमनने हे सुट्टीचे दिवसही घरासाठी वाहिलेले असतात. आणि यातूनच बाॅक्सिंग किंवा कुस्तीमध्ये सुवर्णपदक पटकावण्यापासून देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यन्त मजल मारण्यापर्यन्त काहीही करायला ही स्त्री सक्षम असते.''

''कामातलं समर्पण, तल्लख बुद्धी, शिस्त आणि इच्छाशक्ती यात आम्ही कधीच स्त्रियांशी बरोबरी करू शकत नाही. स्त्रियांकडे संकटाशी लढण्याची आणि राखेतून विश्व उभं करण्याची असामान्य हिंमत आणि ताकद असते. या जगात जर पोलादाहून मजबूत आणि मेणाहून मऊ जर कुणी असेल तर ती 'स्त्री' ! महिला दिनानिमित्त घर सांभाळून नोकरी, व्यवसाय करणार्‍या सगळ्या सावित्रीच्या लेकींना कडकडीत सलाम !- किरण माने.'' अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com