Kiran Mane: "माझ्या मनावरच्या सगळ्या जखमा भरून काढणारं जगातलं सर्वात मौल्यवान अवॉर्ड..", मानेंची पोस्ट व्हायरल

Kiran Mane shared post about Marathi Big Boss Show
Kiran Mane shared post about Marathi Big Boss Show Esakal

Kiran Mane: गेल्या काही दिवसांपासून मराठी मनोरंजन विश्वात किरण माने बरेच चर्चेत आहेत. यापुर्वी ते वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असायचे तर सध्या ते त्याच्या पोस्टमुळे चर्चेत असतात. किरण माने यांना खरी प्रसिद्धी मिळाली ती बिग बॉसमुळे. या शोमुळे त्यांची मुंबईत सह ग्रामीण भागात त्यांची प्रचंड हवा आहे.

किरण माने हे बिग बॉसच्या चौथ्या पर्वात सहभागी झाले होते. वयाच्या ५२ व्या वर्षी साताऱ्यातल्या बच्चन म्हणावणारे किरण माने यांनी बिग बॉसच्या घरात आपल्या जबरदस्त खेळीने टॉप ३ पर्यंत मजल मारली होती. मात्र या शोच्या ट्रॉफीवर ते आपलं नावं कोरु शकले नाहीत. तरी देखील त्यांना प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळाले.

Kiran Mane shared post about Marathi Big Boss Show
Jui Gadkari: "फोटोमध्ये खाली का बसलीय?" चाहत्याने प्रश्न विचारताच जुई गडकरीने दिलं चोख उत्तर

किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सातत्याने ते काहीना काही पोस्ट करत असतात. आज पुन्हा एकदा त्यांना बिग बॉसच्या खेळाची आठवण आली आज त्यांना आता 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. या निमित्त त्यांनी पोस्ट शेयर केली आहे.

या पोस्टमध्ये किरण माने लिहितात की, "१ ऑक्टोबर...आज एक वर्ष झालं 'बिग बाॅस'च्या त्या नादखुळा घरात पाऊल ठेवलेल्याला.

अजूनबी विश्वास बसत नाय भावांनो...तब्बल शंभर दिवस टिकून राहिलो त्या घरात !

Kiran Mane shared post about Marathi Big Boss Show
Jay Bhanushali : 'तू तो व्हिडिओ दहा दिवसांच्या आत डिलीट कर नाहीतर...'! जयवर एवढं कोण भडकलं, काय आहे कारण?

या घरानं माझं आयुष्य लखलखीत करुन टाकलं... संघर्षाचं सोनं केलं... नव्हत्याचं होतं केलं... माझ्या चाहत्यांना पराकोटीचा आनंद दिला... मला पूर्वी ट्रोल करणारेबी प्रेमात पडले, चाहते झाले... द्वेष करणार्‍यांची बोलती बंद झाली... तिथनं परतल्यावर राजधानी सातार्‍यात पाऊल ठेवल्या-ठेवल्या माझ्यावर प्रेम करणार्‍यांनी माझी जल्लोषात मिरवणूक काढली ती आयुष्यभर विसरणार नाय गड्याहो !

ह्या जादूई घरात पाऊल ठेवण्याआधी आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या वादळाला तोंड दिलं होतं. बलाढ्य यंत्रणेविरुद्ध जीवाच्या आकांतानं लढलो होतो. काळजावर झालेल्या खोट्या आरोपांच्या जखमा ओल्या होत्या. वेदनांनी घुसमटलो होतो. त्यामुळं आता हा माझ्यासाठी खेळ राहिला नव्हता, स्वत:ला सिद्ध करायची शेवटची संधी होती.

Kiran Mane shared post about Marathi Big Boss Show
Swachhata Hi Seva Abhiyan: विसर्जनानंतर श्रेयस तळपदेकडून वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छतेसाठी श्रमदान!

मी जिद्दीची, चिकाटीची, धाडसाची, स्वत्वाची, सत्वाची परीसीमा गाठली... शारीरीक-मानसिक दोन्ही बळामध्ये निम्म्या वयाच्या तरण्याबांड पोरांना जबरी टक्कर देऊन चारी मुंड्या चित केलं... ज्यांना मित्र मानलं त्यांच्यासाठी मात्र सर्वस्व उधळलं.

या घरानं मला तेजस्विनी लोणारी सारखी जिवाला जीव देणारी आयुष्यभराची मैत्रीण दिली. राखीबरोबर केलेले हेल्दी फ्लर्टिंग बाहेर प्रेक्षकांनी फुल्ल एंजाॅय केले. विक्याबरोबर नंतर-नंतर बिनसलं, पण तरीबी आम्ही दोघांच्या मैत्रीनं पहिले पाचसहा आठवडे अख्ख्या घराला भुंगा लावलावता. त्याच्याबरोबरचे ते दिवस अद्भूत होते !

हा जो व्हिडीओ हाय... तो 'फायनॅलिस्ट' म्हणून बिगबाॅसनं मला केलेला 'सॅल्यूट' होता... माझं कौतुक करताना बिगबाॅसनं जे शब्द वापरलेत ते कायमचे काळजात कोरून ठेवलेत. 'अजिंक्य तारा... द किरण माने' ! माझ्या मनावरच्या सगळ्या जखमा भरून काढणारं, ते माझं जगातलं सगळ्यात मौल्यवान अवॉर्ड हाय हे... लब्यू बिगबॉस."

किरण माने यांची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी त्याच्या पोस्टला कमेंट करत आहे. आमच्यासाठी तुम्हीच विजेता आहेत. असंही मानेंचे चाहते सांगत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com