'शेफालीला किस करताना भावना जागृत झाल्या तर?'; किर्तीने सांगितला अनुभव | Kirti Kulhari | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shefali Shah and Kirti Kulhari

'शेफालीला किस करताना भावना जागृत झाल्या तर?'; किर्तीने सांगितला अनुभव

पडद्यावर अ‍ॅक्शन किंवा कॉमेडी सीन साकारण्यापेक्षा रोमँटिक सीन साकारणं खूप अवघड असतं, हे अनेक कलाकारांनी आजवरच्या त्यांच्या अनुभवावरून सांगितलं. पण तोच रोमँटिक सीन जर पुरुष आणि महिला यांच्यात नसून दोन महिलांमध्येच असला तर त्यासाठी मानसिक तयारी करणं किती गरजेचं असतं याविषयी अभिनेत्री किर्ती कुल्हारी (Kirti Kulhari) व्यक्त झाली. डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील 'ह्युमन' (Human) या शोमध्ये किर्ती कुल्हारी आणि शेफाली शाह (Shefali Shah) या दोघी डॉक्टरांच्या भूमिकेत आहेत. याच शोमध्ये दोघींचा किसिंग सीन आहे. एका महिलेसोबत ऑनस्क्रीन केमिस्ट्री तयार करणं किती अवघड असतं, याविषयी तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं.

"या शोमध्ये आमचा किसिंग सीनसुद्धा आहे. अभिनेत्री असल्याने मी त्यास नकार नाही दिला. पण तरी तो सीन साकारणं माझ्यासाठी जरा विचित्र होतं. याआधी कधीच मी असे दृश्य दिले नव्हते. अशा सीनसाठी कितीही तयारी केली तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही हे मला ठाऊक होतं. माझ्यासमोर महिला आहे की पुरुष हा प्रश्न नव्हता, तर त्या व्यक्तीसाठी माझ्या काय भावना असतील, त्या भावना पडद्यावर उतरवणं हे मोठं आव्हान होतं", असं किर्ती म्हणाली.

हेही वाचा: अखेर घटस्फोटाबाबत नाग चैतन्यने सोडलं मौन; म्हणाला "जर समंथा खूश असेल.."

शेफालीसोबतच्या किसिंग सीनसाठी ८-१० रिटेक दिले

"आमच्यापेक्षा जास्त दिग्दर्शक मोझेज सिंग हेच तणावात दिसत होते. माझ्या डोक्यात त्यावेळी वेगळेच विचार होते. किस करताना जर माझ्यातील भावना जागृत झाल्या तर काय, असा प्रश्न पडला. किंबहुना हाच प्रश्न मला सतत सतावत होता. त्या दृश्यासाठी आम्ही आधी सराव केला नव्हता. पण वेगवेगळ्या अँगल्समधून ते चित्रित करण्यासाठी आम्हाला आठ ते दहा रिटेक द्यावे लागले. सीन चित्रित झाल्यानंतर मी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र तेव्हाच दिग्दर्शक पुन्हा आले आणि त्यांनी आणखी काही रिटेक द्यायला सांगितले", असं ती पुढे म्हणाली.

रोमँटिक सीन साकारण्यामागचं आव्हान

"काही वेळा रिटेक दिल्यानंतर आम्हाला रोबोट्स असल्यासारखं वाटू लागलं होतं. सेक्स सीन असो किंवा किसिंग सीन्स असो, त्यांच्याबाबतीत असंच घडत असावं. लोकांना याविषयी खूप कुतुहल असतं की हे सीन कसे चित्रित केले जातात, पण ते सर्वांत कंटाळवाणं शूटिंग असतं. तुमच्या अवतीभोवती १०० जण असतात आणि त्यात तुम्हाला कोणतीच प्रायव्हसी मिळत नाही. दिग्दर्शकांच्या अ‍ॅक्शन-कट, अ‍ॅक्शन-कट याच शब्दांभोवती तुम्हाला फिरायचं असतं. या सर्व गोष्टींच्या दरम्यान, तुम्ही समोरच्या व्यक्तीसाठी काही भावनाच अनुभवू शकत नाही. शेफालीचासुद्धा हा ऑनस्क्रीन पहिलाच किसिंग सीन होता", असं किर्तीने सांगितलं.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :EntertainmentShefali Shah
loading image
go to top