esakal | 'लगेच येतात ज्ञान पाजळायला'; ट्रोलर्सवर भडकली किर्ती कुल्हारी
sakal

बोलून बातमी शोधा

kirti kulhari

'लगेच येतात ज्ञान पाजळायला'; ट्रोलर्सवर भडकली किर्ती कुल्हारी

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अभिनेत्री किर्ती कुल्हारीने Kirti Kulhari सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. यामध्ये किर्ती डॉक्टरच्या वेशात एका व्यक्तीला कोरोनाप्रतिबंधक लस देताना पहायला मिळतेय. मात्र यावरूनच तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. लस दंडावर देण्याऐवजी हाताच्या शिरात दिल्यामुळे तिला ट्रोल करण्यात येतंय. या ट्रोलर्ना किर्तीनेही सडेतोड उत्तर दिलं आहे. आगामी 'ह्युमन' या मेडिकल थ्रिलर चित्रपटात किर्ती डॉक्टरची भूमिका साकारतेय. त्याच्याशी संबंधित व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. (Kirti responds after getting trolled for injecting vaccine slv92)

'तुम्ही लस घेतली का?', असा प्रश्न विचारत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं, 'शूटिंगसाठी वापरलं जाणारं हे खोटं इंजेक्शन आहे. गंमत म्हणून हा व्हिडीओ पोस्ट केला आहे पण त्यातूनही महत्त्वपूर्ण संदेश देण्याचा उद्देश आहे.' किर्तीचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिला इंजेक्शन हातावर देण्यावरून ट्रोल केलं आहे.

हेही वाचा: 'झी मराठी'वरील तीन लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

ट्रोलर्सना किर्तीचं उत्तर-

'कमेंट करणं थांबवा, सर्वांना माहितीये की लस कुठे देतात. आधी कॅप्शन नीट वाचा. तुम्हाला बोलण्यासाठी फक्त संधी हवी असते. लगेच येतात ज्ञान पाजळायला', अशा शब्दांत किर्तीने ट्रोलर्सना सुनावलं.

किर्तीच्या आगामी 'ह्युमन' या सीरिजमध्ये शेफाली शाह, राम कपूर, सीमा बिस्वास, मोहन आगाशे, आदित्य श्रीवास्तव यांच्याही भूमिका आहेत. दहा एपिसोड्सची ही सीरिज डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. विपुल आणि मोझेज सिंग यांनी मिळून या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

loading image
go to top