esakal | 'झी मराठी'वरील तीन लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?
sakal

बोलून बातमी शोधा

marathi serials

'झी मराठी'वरील तीन लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

sakal_logo
By
स्वाती वेमूल

कलाकारांचं दमदार अभिनय आणि कथानकात येणारे रंजक वळण यांमुळे झी मराठी वाहिनीवरील अनेक मालिकांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. या मालिकांमधील कलाकार आणि पात्रं हे प्रेक्षकांच्या कुटुंबाचा एक भागच बनले. मात्र आता झी मराठी वाहिनीवरील तीन मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं कळतंय. या मालिकांना टीआरपी मिळत नसल्याने त्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात येतोय, असं समजतंय. या तीन जुन्या मालिकांच्या जागी आता नवीन मालिका आणि त्यासोबतच नवीन कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत. (these three popular marathi tv serials of zee marathi to end soon slv92)

गेल्या आठवड्याभरात झी मराठीने तीन नव्या मालिकांचे प्रोमो प्रसारित केले. 'ती परत आलीये', 'माझी तुझी रेशीमगाठ' आणि 'मन झालं बाजिंद' या तीन नव्या मालिका आहेत. यापैकी 'ती परत आलीये' ही मालिका १६ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'देवमाणूस' या मालिकेची जागा ही नवी मालिका घेणार आहे. 'मन झालं बाजिंद' या मालिकेतून अभिनेता वैभव चव्हाण आणि अभिनेत्री श्वेता राजन हे दोघे पहिल्यांदाच प्रमुख भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटिस येणार आहेत. 'अग्गंबाई सूनबाई' या मालिकेलाही प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाहीये. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात ही मालिकासुद्धा बंद होणार आहे. 'देवमाणूस' आणि 'अग्गंबाई सूनबाई' या दोन मालिकांसोबतच 'कारभारी लयभारी' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं कळतंय. तर 'मन झालं बाजिंद' या नव्या मालिकेच्या पोस्टने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं.

हेही वाचा: श्रेयस तळपदेच मराठी टेलिव्हिजनवर पुनरागमन

झी मराठी वाहिनीवरील सर्वाधिक चर्चेत असलेली 'येऊ कशी तशी मी नांदायला' ही मालिकासुद्धा प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समजतंय. या मालिकेतील ओमकार आणि स्वीटूच्या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकली. मात्र आता मालिकेचं कथानक रटाळवाणं आणि कंटाळवाणं होत असल्याच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

loading image
go to top