मधुबालासोबतच्या लग्नासाठी किशोरने धर्म बदलला होता का ? बहिणीचं स्पष्टीकरण | Kishor Kumar And Madhubala | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Madhubala And Kishor Kumar News

मधुबालासोबतच्या लग्नासाठी किशोरने धर्म बदलला होता का ? बहिणीचं स्पष्टीकरण

मधुबालाची बहीण मधूर भूषण या पुन्हा एकदा स्पष्टपणे दिवंगत सुपरस्टारविषयी बोलल्या आहेत. मधुबाला यांची भारतातील सर्वात सुंदर आणि यशस्वी अभिनेत्री म्हणून गणना होते. मुघल ए आझम कलाकाराचे केवळ ३६ व्या वर्षी हृदयाच्या आजारपणामुळे मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूच्या काही वर्षांपूर्वी, त्यांनी महान गायक किशोर कुमार (Kishor Kumar) यांच्याशी विवाह केला होता. गायकाने त्यांच्याशी लग्न करण्यासाठी त्यांचा धर्म बदलला अशा अफवा उठत होत्या. आता मधुबाला (Madhubala) यांच्या बहिणीने स्पष्टपणे सांगितले, की किशोर कुमार यांनी कधीच स्वतःचा धर्म बदलला नाही.

हेही वाचा: मधुबाला यांच्यावर बायोपीक; किशोर कुमारांचे सुपुत्र अमित कुमार स्पष्टच बोलले

मधुबाला यांचे खरे नाव मुमताज जेहान बेगम देहलवी असे होते. त्यांनी १९६० मध्ये किशोर कुमार यांच्याशी विवाह केला. त्यानंतर मधुबालाच्या उपचारासाठी ते लंडन गेले. किशोर कुमार यांनी त्यांचा धर्म मधुबालाशी विवाह करण्यासाठी बदलला हे पूर्णपणे चुकीचे आहे. मधुर एका मुलाखतीत म्हणाल्या, अनेक लोक म्हणतात की किशोर कुमार यांनी इस्लाम धर्म स्वीकारुन मधुबालाशी विवाह केला, हे पूर्णपणे सत्य नाही. ते हिंदू होते आणि हिंदू म्हणूनच त्यांनी जगाचा निरोप घेतला. मधुबालाची बहीण मधुर भूषण यांनी हिंदू पंजाबी व्यक्तीबरोबर विवाह केला आहे.

हेही वाचा: गाण्यांना 'अजरामर' करणारे किशोर कुमार

त्यांच्या दुसऱ्या बहिणीने चंचलने पंजाबीबरोबर विवाह केला आणि त्यांच्या दोन बहिणी अल्ताफ आणि अनिझ यांनी पारशी व्यक्तींशी विवाह केला. मधुबाला आणि किशोर कुमार यांचे लग्न १९६९ पर्यंत टिकले म्हणजे तिच्या मृत्यूपर्यंत. त्या नऊ वर्ष अंथरुणाला खिळून होत्या. केवळ दोन वर्ष लंडनमध्ये त्यांनी उपचार घेतले. बसंत चित्रपटात १९४२ मध्ये त्यांनी बाल कलाकार म्हणून सुरुवात केली. मधुबाला यांनी नील कमल (१९४७) चित्रपटात भूमिका निभावली. त्यांना भारताची मरिलिनी मन्रो आणि ट्रॅजिडी क्विन ऑफ बाॅलीवूड म्हणून ओळखल्या जातात. मुघल-ए-आझम, मिस्टर आणि मिसेस ५५, चलती का नाम गाडी, हाफ तिकेट, हावरा ब्रीज, काला पानी आणि बरसात की रात ही त्यांची गाजलेली चित्रपट (Bollywood) आहेत.

Web Title: Kishore Kumar Marriage Hindu Madhubala Religion Sister Madhur Bhushan Bollywood

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :bollywood